घरमहाराष्ट्रविदर्भात भाजपला मोठा फटका

विदर्भात भाजपला मोठा फटका

Subscribe

विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत. उलट २०१४ साली मिळालेल्या जागाही कमी झाल्या. त्याचे मुख्य कारण अर्थातच विदर्भ आहे. २०१९ सालच्या निवडणुकीत भाजपला विदर्भात मोठा फटका सहन करावा लागला आहे. विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत विदर्भात भाजपला तब्बल ४३ जागा मिळाल्या होत्या. त्या तुलनेत इतर पक्षांचे विदर्भातील यश नगण्य होते. येथे काँग्रेसला १०, राष्ट्रवादी काँग्रेसला १, शिवसेनेला ४ आणि इतर पक्षांना ४ जागा होत्या.

विदर्भात मिळालेल्या या भरघोस यशाच्या जोरावर भाजपने तेव्हा १२२ जागांपर्यंत मजल मारली होती. २०१९ सालीही भाजपला विदर्भाकडून मोठ्या आशा होत्या. मात्र भाजपचे धाडस त्यांच्या अंगलटी आले. २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने विदर्भातील जनतेला वेगळ्या विदर्भाचे आश्वासन दिले होते. ते आश्वासन अर्थातच भाजपने पूर्ण केले नाही. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या मर्जीतल्या उमेदवारांना तिकीट दिल्यामुळे येथील भाजपचा कार्यकर्ताही नाराज होता. त्याचा फटका यावेळी भाजपला मोठ्या प्रमाणात बसला.

- Advertisement -

विदर्भातील पक्षीय बलाबल
२०१४
भाजप -४३
शिवसेना -४
काँग्रेस – १०
राष्ट्रवादी -१
इतर – ४
एकूण -६२

२०१९
भाजप -२९
शिवसेना -३
काँग्रेस – १७
राष्ट्रवादी – ५
इतर – ७
एकूण -६२

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -