घरक्रीडाशिवपाल सिंगला सुवर्ण

शिवपाल सिंगला सुवर्ण

Subscribe

जागतिक सैन्य खेळ स्पर्धा

भारताचा भालाफेकपटू शिवपाल सिंगने चीनमध्ये सुरू असलेल्या जागतिक सैन्य खेळांमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. तसेच नेमबाज गुरप्रीत सिंगला २५ मीटर प्रकारात कांस्यपदक मिळवण्यात यश आले. हवाई दलाच्या शिवपालने ८३.३३ मीटर लांब भालाफेक करत हे सुवर्णपदक पटकावले. यावर्षी दोहा येथे झालेल्या आशियाई स्पर्धांमध्ये शिवपालने रौप्यपदक मिळवले होते. त्याने ८६.२३ मीटरचे अंतर नोंदवत हे पदक मिळवले होते, जी त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी होती.

दुसरीकडे नेमबाजीच्या २५ मीटर प्रकारामध्ये गुरप्रीत सिंगने ५८५ गुणांसह जागतिक सैन्य खेळांमध्ये कांस्यपदक मिळवले. गुरप्रीतने २०१८ साली झालेल्या जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदकाला गवसणी घातली होती. तसेच पॅरा-खेळाडू आनंदन गुसेकरनने या स्पर्धेत आपल्या तिसर्‍या सुवर्णपदकाची कमाई केली.

- Advertisement -

जागतिक सैन्य खेळ चीनमध्ये होण्याची पहिलीच वेळ आहे. या स्पर्धेत १४० देशांमधून दहा हजारपेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग घेतला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -