भाजप ओबीसी सेलच्या बैठकीला पंकजा मुंडे गैरहजर; बावनकुळेंनी दिलं स्पष्टीकरण

BJP leader pankaja munde tested corona omicron positive quarantine at home
Corona Virus: पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोना, ओमिक्रॉनची शक्यता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळ विस्तारात प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्याने भाजपच्या सचिव पंकजा मुंडे अजूनही नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्यात सोमवारी पार पडलेल्या भाजपच्या ओबीसी सेलच्या बैठकीला गैरहजर असल्याने चर्चांना अधिकचा जोर मिळाला. या बैठकीला भाजपचे नेते आणि माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे गैरहजर होते. त्यामुळे नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र, आता बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

मी उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर असल्यानं ओबीसी सेलच्या बैठकीला नव्हतो, पंकजा ताई नियोजित कार्यक्रमासाठी असल्यानं त्या ही गैरहजर होत्या, कोणी नाराज नाही, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. आज ते नाशिक येथे भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणावरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधला.

पवार, ठाकरे, थोरात झारीतील शुक्राचार्य

महाविकास आघाडी सरकारमधील काही नेत्यांना २०२२ पर्यंत ओबीसींना आरक्षण द्यायचं नाही. यामुळे वेगवगळ्या भुमिका मांडल्या जात आहेत, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. एवढ्यावरच न थांबता चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट शरद पवार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात हे झारीतील शुक्राचार्य असून यांनाच ओबीसींना आरक्षण मिळू द्यायचे नाही असा थेट आरोप केला आहे.