घरमहाराष्ट्रHSC Result 2021 : मुसळधार पावसामुळे यंदा १२ वीच्या निकालास होणार उशीर?

HSC Result 2021 : मुसळधार पावसामुळे यंदा १२ वीच्या निकालास होणार उशीर?

Subscribe

राज्यभरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका य़ंदा १२ वीच्या अंतिम निकालावर बसण्याची शक्यता आहे. पावसामुळे मुंबई, ठाणे, कोकण अशा अनेक भागांत वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून शिक्षकांना महाविद्यालयात पोहचणे शक्य झाले नाही. त्यामुळे बारावीच्या अंतिम निकालासाठी गुणांचे मूल्यमापन करण्याचे काम वेळे पूर्ण होऊ शकले नाही. तसेच निकालासंबंधीत अनेक कामे रखडली आहेत. त्यामुळे बारावीच्या निकालाचे काम पूर्ण करण्यासाठी चार ते पाच दिवस वाढवून द्यावे अशी मागणी शिक्षकांनी केली आहे.

चार ते पाच दिवस वाढवून द्या, शिक्षकांची मागणी 

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एचएससी बोर्डाची बारावीची परीक्षा रद्द केली आणि अंतर्गत मूल्यमापनाचे काम २३ जुलैपर्यंत पूर्ण करा असे आदेश शिक्षकांना देण्यात आले आहेत. त्यामुळे गेल्या काही आठवड्यांपासून शिक्षकांनी निकाल तयार करण्यासाठी कॉलेजमध्ये १२-१२ तास मुक्काम ठोकला. मात्र गेले दोन दिवस सतत पाऊस पडत असल्याने अनेक शिक्षकांना महाविद्यालय पोहचणे जमले नाही. २३ जुलैपर्यंत निकाल जाहीर करणे शक्य होणार असल्याचे शिक्षकांनी जाहीर केले आहे.

- Advertisement -

अंतिम निकाल पूर्ण करण्यास अवघे तीन दिवस शिल्लक

आज पावसाने उसंती घेतल्यानंतर शिक्षक वर्ग आज महाविद्यालयात पोहचला, मात्र दोन दिवसांपासून निकालासंबंधीत काम पूर्णपणे ठप्प होते. त्यामुळे अंतिम निकाल जाहीर करण्यास अवघे तीन दिवस शिल्लक असताना निकालाचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. यात अनेक शिक्षकांना कॉलेजमध्ये येऊन निकाल पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत.

१४ ते २३ जुलैपर्यंत शिक्षकांनी निकाल समितीने प्रमाणित केल्यानुसार विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण एचएससी बोर्डाच्या संगणकीय प्रणालीमध्ये अपलोड करायचे आहेत. मात्र पावसामुळे दोन दिवस आधीच असेच गेले आणि आता बकरी ईद, एकादशीची सुट्टी असल्याने पुढील दोन दिवसही काम करण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे शिक्षकांकडून वेळ वाढवून मागितली जात आहे.

- Advertisement -

राज्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी इंटरनेट, वीज खंडित झाली. तसेच वाहतुकी कोंडी आणि वाहन उपलब्ध नसल्याने शिक्षकांना महाविद्यालयात पोहचणे अवघड झालेय किंवा पोहचण्यास उशीर होत आहे. याबाबींचा विचार व्हावा अशी मागणी शिक्षकांनी केली आहे. तसेच शिक्षण मंडळाने बारावीचे गुण भरण्यासाठी १४ ते २१ जुलैपर्यंतची वेळ दिली अली तरी रविवार व आषाढी एकादशी, बकरी ईद या सुट्ट्यांचा विचार केलाच नाही अशी टीका शिक्षकांकडून केली जात आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -