Thursday, July 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन अभिनेत्री सविता बजाज यांच्या उपचाराकरीता सुप्रिया पिळगावकर यांचा मदतीचा हात

अभिनेत्री सविता बजाज यांच्या उपचाराकरीता सुप्रिया पिळगावकर यांचा मदतीचा हात

उपचाराकरीता देखील पैसे शिल्लक नसल्यामुळे त्यांची प्रकृतीदेखील बिघडली असल्याची माहिती समोर येत आहे.

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री सविता बजाज यांनी निशांत, नजराना, बेटा हो तो ऐसा यासारख्या हिट सिनेमात काम केलं आहे. पण सध्या सविता यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असून त्यांची परीस्थिती अत्यंत हालाखीची झाली आहे. पैशांच्या तुडवड्यामुळे त्यांच्या जवळ उपचाराकरीता देखील पैसे शिल्लक नसल्यामुळे त्यांची प्रकृतीदेखील बिघडली असल्याची माहिती समोर येत आहे. अशातच सविता यांच्या मदतीकरीत‌ा दिग्गज अभिनेते सचिन पिळगावकर आणि त्यांची पत्नी सुप्रिया पिळगावकर यांनी पुढाकार घेत त्यांच्यावर उपचार करण्याची जबाबदारी स्विकारली आहे. सध्या सविता बजाज रुग्णालयात दाखल असून अभिनेत्री नुपूर अलंकार त्यांची काळजी घेत आहे. नुपर नुकतच ‘टाइम्स ऑफ इंडिया’ ला दिलेल्या मुलाखती दरम्यान म्हणाली, “अभिनेत्री सविता बजाज यांच्या बद्दल कळल्यानंतर अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांनी मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.(actress supriya pilgaonkar comes out for financial support for actress savita bajaj) तसेच सुप्रिया यांच्यासोबत CINTAAच्या मेंबर्सने देखील सविता यांना मदत करण्याता निर्णय घेतला आहे. सध्या सविता यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं आहे. अशातच सुप्रिया पिळगावकर आणि CINTAA ने मदतीचा हात देत हॉस्पिटलचे बिल भरल्याची माहिती नुपूरने दिली आहे.”

सविता बजाज गेली अनेक वर्षे आर्थिक संकटाचा सामना करत असून त्यांनी साठवून ठेवलेल्या पैशांवर दिवस काढत असल्याचे कळतेयं अशातच त्यांना वाढत्या वयाबरोबर आजारपणाचा सामना करावा लगला आणि या कठिण काळात उपचार करण्यासाठी देखील त्यांच्याजवळ काहीच पैसे शिलल्क राहीले नहीत.


- Advertisement -

हे हि वाचा-राज कुंद्राने शिल्पाला दिले आहेत अत्यंत महागडे गिफ्ट, किंमत ऐकून चकीत व्हाल

- Advertisement -