घरक्राइमCrime: शिवसेना आमदारांच्या बाचाबाचीनंतर भाजपा मंत्र्याने केली मारहाण; मरीन ड्राइव्ह ठाण्यात तक्रार 

Crime: शिवसेना आमदारांच्या बाचाबाचीनंतर भाजपा मंत्र्याने केली मारहाण; मरीन ड्राइव्ह ठाण्यात तक्रार 

Subscribe

मुंबई – विधिमंडळाच्या लॉबीमध्ये शिवसेनेचे मंत्री दादा भुसे, आमदार महेंद्र थोरवे एकमेकांवर भिडले. सत्ताधारी आमदार गोळीबार करत आहेत. रस्त्यात तरुणांना बदडत आहेत. आता विधिमंडळाच्या आवारात भिडल्याची घटना ताजी असतानाच आता भाजपच्या एका मंत्र्यावर मारहणीचा आरोप झाला आहे. छ. संभाजीनगर पूर्वचे भाजप आमदार आणि गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्यावर मारहाणीचा आरोप झाला आहे. हा आरोप भाजप कार्यकर्त्यानेच केला आहे. या संबंधीची तक्रार मुंबईतील मरीनड्राइव्ह पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधिमंडळाच्या लॉबीमध्ये शिवसेनेचे मंत्री दादा भुसे आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यात झटापट झाल्याची घटना घडली. ही घटना ताजी असतानाच भाजप आमदार आणि मंत्री अतुल सावेंनी मारहाण केल्याची तक्रार मरीनड्राइव्ह पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. मंत्री सावे यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. मंत्री सावे यांच्यावर कडक कारवाईची मागणी भाजप पदाधिकाऱ्याने केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Anganewadi Yatra : आंगणेवाडी यात्रेला सुरुवात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह अनेक मंत्री लावणार हजेरी

भाजपाचे संभाजीनगरमधील पदाधिकारी आसाराम उत्तमराव डोंगरे हे त्यांच्या कामानिमित्त मुंबईत आले आहे. ते देवेंद्र फडणवीस प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत. 1 मार्च रोजी आसाराम डोंगरे कॅबिनेट मंत्री सावेंना भेटायला गेले. यावेळी त्यांनी तु इथे कशाला आलास, तुला सांगितले होते का यायला. मी तुझे काम करणार नाही, असे म्हणत माझे लेटर फेकून दिले असा आरोप डोंगरेंनी त्यांच्या तक्रारीत केला आहे. त्यात पुढे म्हटले आहे की, तू देवेंद्र फडणवीस काय, नरेंद्र मोदी किंवा अमित शहांनांही सांगितले तरी तुझे काम करणार नाही. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार शाब्दिक बाचाबाचीनंतर डोंगरे यांना सावे यांनी दोन चापटा लगावल्या. त्यांचा पीए प्रविण चव्हाण, अशोक शेळके यांनी मारहाण करायला सुरुवात केली.

- Advertisement -

मंत्री सावे यांनी आसाराम डोंगरे यांना धमकावले की, तू देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंच्या संपर्कात राहतो. एवढा मोठा झाला का? तुझी औकात काय? असे म्हणत मंत्री सावे यांनी डोंगरेंना शिवीगाळ केली. अपमानास्पद वागणूक दिली. या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्याची विनंती तक्रारदार डोंगरेंनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -