घरमहाराष्ट्रआमदारांनी वाजवला कोरोना नियमांचा बँड; राम सातपुतेंच्या लग्नात नियमांचं उल्लंघन

आमदारांनी वाजवला कोरोना नियमांचा बँड; राम सातपुतेंच्या लग्नात नियमांचं उल्लंघन

Subscribe

माळशिरसचे भाजपचे आमदार राम सातपुते यांचे रविवारी पुण्यात थाटामाटात लग्न पार पडले. मात्र, या लग्न सोहळ्यात कोरोना संदर्भातल्या नियमांना तिलांजली देण्यात आली. लग्न किंवा तत्सम सोहळ्यासाठी ५० पेक्षा जास्त जणांची उपस्थिती नको असा नियम आहे. मात्र, भाजपचे आमदार राम सातपुते यांच्या लग्नाची दृष्ये पाहिल्यानंतर कोरोनाच्या नियमांचा कसा बँड वाजवण्यात आला हे दिसून आले. दरम्यान, जे नेते राम सातपुते यांच्या लग्नाला पाहुणे म्हणून हजर राहिले त्यांनी देखील कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केले. अनेक नेते विना मास्क होते. शिवाय, सोशल डिस्टंसिंगचे तीन तेरा वाजवण्यात आले.

माळशिरसचे भाजप आमदार राम सातपुते विवाहबंधनात अडकले. पुण्यातील शुभारंभ लॉन्समध्ये अत्यंत थाटामाटात हा विवाहसोहळा पार पडला. मात्र सातपुतेंच्या लग्नात पाहुण्यांची अलोट गर्दी लोटल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला. विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह भाजपच्या दिग्गज नेत्यांनी लग्नाला हजेरी लावली होती. लग्न सोहळ्यात कोरोनाच्या नियमांना तिलांजली देण्यात आली. ५० हून अधिक जण लग्नाला उपस्थित होते. लग्न सोहळ्याला आलेल्या नेत्यांच्या तोंडवरुन मास्क गायब होते. लग्न किंवा तत्सम सोहळ्यासाठी ५० पेक्षा जास्त जणांची उपस्थिती नको असा नियम आहे. मात्र, कोरोनाचे नियम लोकप्रतिनिधींनी धाब्यावर बसवले. सर्वसामन्यांनी नियम मोडल्यावर प्रशासन कारवाई करते. त्यामुळे आमदारांवर कारवाई करणार का? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -