घरमहाराष्ट्रभाजपने दिली शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर

भाजपने दिली शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर

Subscribe

सत्तेत समसमान वाटा देण्याचा भाजपने दिलेला शब्द न पाळल्यामुळे नाराज झालेली शिवसेना भाजपबरोबर सत्तेत सहभागी होणार की नाही, असे वातावरण गेले काही दिवस होते. पण, आता या मानापमान नाटकावर पडदा पडण्याची शक्यता आहे. भाजपने शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याने शिवसेना नरमाईची भूमिका घेते की दुसरा पर्याय शोधते यासाठी पुढील ४८ तास महत्त्वाचे आहेत. उपमुख्यमंत्रीपद आणि १३ मंत्रीपदे हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रस्ताव शिवसेनेला मान्य झाल्याची माहिती भाजपच्या गोटातून देण्यात येत आहे. त्यामुळे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतील, असे सांगण्यात येत आहे.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद आणि समसमान मंत्रीपदे यावर शिवसेना अडून बसली होती. या निमित्ताने ‘सामना’ मुखपत्रातून त्यांनी भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडली नव्हती. मात्र, भाजपने त्याला फार महत्व न देता देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड करून मुख्यमंत्रीपदी त्यांचे नाव निश्चित केले. भाजप एक पाऊल पुढे जात असताना शिवसेनेकडे त्यांच्यामागून जाण्याशिवाय पर्याय नव्हता आणि तेच चित्र शिवसेना भवन येथे गुरुवारी दिसून आले.

- Advertisement -

मुंबई8 सत्तेत समसमान वाटा देण्याचा भाजपने दिलेला शब्द न पाळल्यामुळे नाराज झालेली शिवसेना भाजपबरोबर सत्तेत सहभागी होणार की नाही, असे वातावरण गेले काही दिवस होते. पण, आता या मानापमान नाटकावर पडदा पडण्याची शक्यता आहे. भाजपने शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याने शिवसेना नरमाईची भूमिका घेते की दुसरा पर्याय शोधते यासाठी पुढील ४८ तास महत्त्वाचे आहेत. उपमुख्यमंत्रीपद आणि १३ मंत्रीपदे हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रस्ताव शिवसेनेला मान्य झाल्याची माहिती भाजपच्या गोटातून देण्यात येत आहे. त्यामुळे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतील, असे सांगण्यात येत आहे.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद आणि समसमान मंत्रीपदे यावर शिवसेना अडून बसली होती. या निमित्ताने ‘सामना’ मुखपत्रातून त्यांनी भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडली नव्हती. मात्र, भाजपने त्याला फार महत्व न देता देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड करून मुख्यमंत्रीपदी त्यांचे नाव निश्चित केले. भाजप एक पाऊल पुढे जात असताना शिवसेनेकडे त्यांच्यामागून जाण्याशिवाय पर्याय नव्हता आणि तेच चित्र शिवसेना भवन येथे गुरुवारी दिसून आले.

- Advertisement -

कुणीही मुख्यमंत्रीपदाचा अमरपट्टा घातलेला नाही
५०-५० फॉर्म्युल्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेला सत्तेत समान वाटा देण्याचे आमचे काही ठरलेले नाही आणि आम्ही कोणाला तसा शब्द दिलेला नाही, असे वक्तव्य फडणवीस यांनी करायला नको होते. याच कारणामुळे सगळी चर्चा फिस्कटली, अशा शब्दांत दोन पक्षांदरम्यान उद्भवलेल्या स्थितीला फडणवीस यांना अप्रत्यक्षपणे जबाबदार धरताना, कुणी मुख्यमंत्रीपदाचा अमरपट्टा घालून आल्याचे समजू नये, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला. मी मित्रपक्षाला मित्रपक्षच मानतो, शत्रूपक्ष मानत नाही, आम्ही स्थिर सरकार देण्याचा प्रयत्न करू असेही उद्धव यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -