घरमुंबईभेंडीबाजारमध्ये आग; १० दुचाकींसह २ चारचाकी जळून खाक

भेंडीबाजारमध्ये आग; १० दुचाकींसह २ चारचाकी जळून खाक

Subscribe

भेंडीबाजारमधील इस्माईल इमारतीमध्ये असलेल्या दुकानाला आज सकाळी आग लागल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये १० दुचाकी तर दोन चारचाकी गाड्या जळाल्या आहेत.

मुंबईच्या भेंडीबाजारमधील एका इमारतीला आग लागल्याची घटना आज सकाळी पहाटेच्या सुमारास घडली आहे. भेंडीबाजारमधील इस्माईल इमारतीमध्ये असलेल्या दुकानाला आज सकाळी अचानक आग लागली. या आगीमध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या १० दुचाकी आणि दोन चारचाकी गाड्या जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या सहा गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.

जीवितहानी नाही

भेंडीबाजारमधील इस्माईल इमारतीत असलेल्या दुकानाला आज पाहाटेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मात्र, या ठिकाणी उभ्या करण्यात येणाऱ्या गाड्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. या आगीत १० दुचाकीसह दोन चाकचाकी गाड्यांची जळून खाक झाली आहे. परंतु, आगीचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -