घरमहाराष्ट्रआघाडीला घेरण्याची भाजपची रणनीती

आघाडीला घेरण्याची भाजपची रणनीती

Subscribe

भाजपच्या बैठकीत अधिवेशनाबाबत चर्चा

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन अधिक काळ चालले असते तर सर्वसामान्यांना न्याय देता आला असता. मात्र, तसे झाले नसले तरी शेतकर्‍यांच्या मुद्यापासून ते आरक्षणाच्या मुद्यापर्यंत अशा सर्व प्रश्नांवर राज्य सरकारला घेरण्याची रणनीती तयार असल्याचे सांगत भाजपने बुधवारी अधिवेशनात राज्य सरकारला धारेवर धरण्याचा इशारा दिला.

कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ आणि ६ जुलै असे दोन दिवस होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज भाजपची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत अनेक मुद्यांवर चर्चा झाली. सत्ताधार्‍यांना घेरण्यासाठी खास रणनीती बैठकीत ठरली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना भाजप आमदार आशिष शेलार म्हणाले की, राज्यासमोर खूप प्रश्न आहेत. अधिवेशन जास्त कालावधीसाठी झाले असते तर जनतेला न्याय देता आला असता. पण यापेक्षा कमी कालावधीसाठी अधिवेशन ठेवता आले नसते म्हणून दोन दिवसांचे अधिवेशन घेतले आहे. शेतकरी आणि आरक्षण या मुद्यावर आम्ही सरकारला धारेवर धरणार आहोत. कोरोनापासून ते आरक्षणापर्यंत अशा सर्वच मुद्यांवर सरकारला घेरण्याची तयारी आम्ही केली आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूरमध्ये विधानसभेची पोटनिवडणूक होणार असून ती जिंकण्याची रणनीती आम्ही तयार केली आहे, असेही शेलार म्हणाले.

- Advertisement -

लसीकरणाचे ढिसाळ नियोजन

राज्यातील अनेक शहर आणि जिल्ह्यांत लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरण ठप्प झाल्यावरून आशीष शेलार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. जगभरातील लोक केंद्र सरकारकडून मार्गदर्शन घेत आहे. मात्र, राज्य सरकारचे नियोजन ढिसाळ आहे. सभागृहात सर्व विषयावर चर्चा व्हावी, अशी अपेक्षा असल्याचेही ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -