घरमहाराष्ट्रआमदार सतेज पाटील यांच्या बंगल्यासमोर भानामतीचा प्रकार

आमदार सतेज पाटील यांच्या बंगल्यासमोर भानामतीचा प्रकार

Subscribe

आमदारा सतेज पाटील यांच्या बंगल्यासमोर विचित्र अशी गोष्ट पाहायला मिळाला आहे.

काँग्रेसचे आमदार आणि माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या घरासमोर भानामतीचा विचित्र प्रकार घडला आहे. एका पांढऱ्या कपड्यामध्ये हळद-कुंकू आणि त्याच्या बरोबर काळ्या रंगाची बाहुली बांधून ती त्यांच्या बंगल्या समोरील झुडपात ठेवल्याचा विचित्र प्रकार बुधवारी पाहायला मिळाला. निवडणुकीच्या तोंडावर असे प्रकार कोल्हापूरता नेहमीच घडत असतात. सतेज पाटील हे कोल्हापूरातील एक वजनदार नेते म्हणून ओळखले जातात. हा प्रकार कुणी केला? हे अद्याप कळू शकलेले नाही.

दुसऱ्यांदा घडली घटना

दरम्यान, गेल्या चार दिवसांमध्ये हा प्रकार दुसऱ्यांदा घडला आहे. मंगळवारी अमावस्येच्या दिवशी मध्यरात्री आमदार सतेज पाटील यांच्या यशवंत नामक निवासाच्या समोर असलेल्या झुडपांमध्ये ही हळद-कुंकू आणि काळ्या कपड्यातील बाहुली लटकवलेली पाहायला मिळाली. त्यामुळे संपूर्ण जिल्हयात अनेक चर्चांना उधाण आले आहे. हा सगळा भानामतीचा प्रकार असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे. दरम्यान, या प्रकारामुळे आमदार सतेज पाटील यांचे समर्थक चांगलेच संतापले आहेत.

- Advertisement -

काळी जादू

आमदार सतेज पाटील यांचा त्यांच्या विधानसभा मतदार संघात चांगलाच दबदबा आहे. मात्र तरिही ते २०१४ साली पराभूत झाले होते. या आधी देखील अनेक निवडणुकांमध्ये अशा प्रकारच्या घटना घडल्याचे पाहायल मिळाले आहे. एखाद्या भोंदू बाबांच्या फसवणुकीला बळी पडून अंधश्रद्धेपोटी अनेक लोक अशाप्रकारचे कृत्य करतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -