घरमुंबई'या' कारणासाठी पोलीस आयुक्त देणार पोलीस ठाण्यांना भेट

‘या’ कारणासाठी पोलीस आयुक्त देणार पोलीस ठाण्यांना भेट

Subscribe

मुंबईचे नवे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी पोलीस ठाण्यांना भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीस ठाण्यातील कामकाज बघण्यासाठी ही भेट देणार आहेत.

मुंबईतील पोलीस ठाण्यातील कामाचा आढावा, तसेच तेथील अधिकारी आणि कर्मचाऱ्याचा समस्या जाणून घेण्यासाठी सह पोलीस आयुक्त प्रत्येक पोलीस ठाण्यांना भेटी देणार आहे. मुंबईचे नवे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी पोलीस ठाण्यांना भेट देण्याचा निर्णय घेतला आहे, या निर्णयाची अंमलबजावणी गुरुवारपासूनच करण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईत शहरासह उपनगरात असलेल्या विभाग प्रत्येक सहपोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना वाटून देण्यात आले आहे. माजी पोलीस आयुक्त अनामी रॉय यांनी देखील मुंबई पोलीस आयुक्त असताना प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये तक्रार निवारण दिन सुरु केला होता, त्यात देखील सह पोलीस आयुक्त दर्जाचा अधिकाऱ्यांची नेमणूक कऱण्यात आली होती.

९४ पोलीस ठाण्यांना भेट

मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी मुंबई पोलीस दलाची सूत्रे हाती घेताच बर्वे यांनी बुधवारी पोलीस अधिकाऱ्याची बैठक घेतली. या बैठकीत सहपोलीस आयुक्त,अपर पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त दर्जाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मुंबईतील पोलीस ठाण्यांना भेट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत असलेल्या ९४ पोलीस ठाण्यांना भेट देण्याची जवाबदारी सह पोलीस आयुक्त यांच्यावर देण्यात आली आहे.

- Advertisement -

अशी असेल भेटीची वेळ

दक्षिण ,मध्य, पूर्व ,पश्चिम आणि उत्तर या पाच विभागात असलेल्या प्रत्येक पोलीस ठाण्यांना सह पोलीस आयुक्त दररोज भेटी देऊन तेथील समस्या जाणून घेणार आहेत. त्याच बरोबर पोलीस ठाण्यातील प्रलंबित गुन्हे मार्गी काढण्यावर भर देण्यात येणार असून पोलीस ठाण्यातील अधिकारी तसेच कर्मचारी यांच्या समस्या जाणून घेण्यात येणार आहे. मुंबई पोलीस दलातील पाचही सहपोलीस आयुक्त प्रत्येकी पोलीस ठाण्यांना दररोज सकाळी १० ते १२ या दरम्यान भेटी देणार आहे. मुंबईतील प्रत्येक पोलीस ठाण्यांना गुरुवार पासून भेटी देण्यास सुरुवात कऱण्यात आली असल्याचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी आपलं महानगरशी बोलताना सांगितले असून या भेटी दरम्यान नागरिकांच्या नागरिकांच्या तक्रारींचे निवारण कऱण्यात येणार असून पोलीस अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून त्याचे निवारण कऱण्यात येणार असल्याचेही बर्वे यांनी सांगितले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -