घरमहाराष्ट्रदिव्यांग वधूला त्रास देणाऱ्याला दणका; मंत्रालयातील विवाह नोंदणी अधिकारी निलंबित

दिव्यांग वधूला त्रास देणाऱ्याला दणका; मंत्रालयातील विवाह नोंदणी अधिकारी निलंबित

Subscribe

क्षितिज नायक आणि विराली मोदी हे दाम्पत्य विवाह नोंदणीसाठी मुंबई उपनगर जिल्हा कार्यालयात दाखल झाले होते.

मुंबई : विवाह नोंदणीसाठी कार्यालयात आलेल्या दिव्यांग वधूला अंगठ्याचे ठसे आणि संगणकावर फोटो काढण्यासाठी दुसऱ्या मजल्यावरील कार्यालयात जबरदस्तीने येण्यास भाग पडणाऱ्या अरुण घोडेकर या विवाह नोंदणी अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अशा पद्धतीने निलंबनाची कारवाई झालेले घोडेकर हे एकमेव आणि अपवादात्मक उदाहरण असल्याची मंत्रालयात चर्चा आहे. (Bums to Harassment of Disabled Bride Ministry of Marriage Registration Officer suspended)

क्षितिज नायक आणि विराली मोदी हे दाम्पत्य विवाह नोंदणीसाठी मुंबई उपनगर जिल्हा कार्यालयात दाखल झाले होते. यासाठी त्यांनी घोडेकर यांना भ्रमणध्वनी द्वारे आगाऊ माहिती दिली होती. विवाह नोंदणी कार्यालय दुसऱ्या मजल्यावर असून कार्यालयाची लिफ्ट बंद होती. विराली मोदी या दिव्यांग असल्याने ही अडचण त्यांनी घोडेकर यांच्या निर्देशन आणली होती. त्यामुळे विवाह प्रक्रिया तळ मजल्यावर करण्याची त्यांनी विनंती केली. मात्र वर आणि वधू यांचे फोटो आणि अंगठ्याचे ठसे संगणकावर घ्यावे लागणार असल्याने घोडेकर यांनी त्यांना दुसऱ्या मजल्यावर येण्याचे सुचविले. त्यामुळे संबंधित दांपत्याने नाईलाजाने नातेवाइकांच्या मदतीने दुसऱ्या मजल्यावर जाऊन विवाह प्रक्रिया पूर्ण केली.

- Advertisement -

हेही वाचा : विश्वचषकात ग्लेन मैक्सवेलचे सर्वात वेगवान शतक; दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ प्लेअरचा मोडला विक्रम

राज्य सरकारकडे करण्यात आली तक्रार

दिव्यांग असूनही दुसऱ्या मजल्यावर जाऊन विवाह नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्यांनतर या दाम्पत्याने घोडेकर यांच्या विरोधात राज्य सरकारकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत घोडेकर यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.

- Advertisement -

हेही वाचा : Parbhani : मराठा आरक्षणामुळे ग्रामपंचायत निवडणूक रद्द होण्याच्या मार्गावर; काय आहे कारण?

नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई

विवाह कायद्यानुसार, संबंधित अधिकाऱ्याला कार्यालयाच्या काही अंतरावर जाऊन विवाह लावण्याची तरतूद आहे. काही कारणास्तव अर्जदार कार्यालयात पोहोचू शकत नसल्यास विवाह अधिकारी त्यांना सहाय्य करू शकतो. पण घोडेकर यांनी विवाह कार्यालयातील नियम पाळले नाही. त्यामुळे नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अरुण घोडेकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येत असल्याचे यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -