घरदेश-विदेश'राम मंदिरासाठी अध्यादेश हीच आमची इच्छा'

‘राम मंदिरासाठी अध्यादेश हीच आमची इच्छा’

Subscribe

आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आयोध्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकरांशी संवाद साधताना ते बोलत होते.

गेल्या वर्षी आयोध्येच्या मुद्यावरून संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणारी शिवसेना पुन्हा एकदा आयोध्येला दाखल झाले आहेत.  शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेत्तृत्वाखाली हा दौरा आयोजीत करण्यात आला आहेअयोध्येतील रामलल्ला मंदिरात जाऊन प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेतले. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यानिमित्त अयोध्येत कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. यावेळी त्यांनी पत्रकरांशी संवाद साधला.

राम मंदिर बनणं हे शुभकार्य आहे. त्यामुळे मी आयोध्येत पुन्हा पुन्हा येतच राहणार आहे. त्याचप्रमाणे आज आयोध्यावासियांना मी शब्द दिला आहे तो मी पाळणारच. ज्या मुद्द्यावर युती झाली ते मुद्दे मागे पडू देणार नाही. लवकरत लवकर राम मंदिर होणार असे अश्वासन त्यांनी आयोध्यावासियांना यावेळी दिले. मंदिरासाठी अध्यादेश आणावा, कायदा करून मंदिर बनवावे. इथे राम मंदिर बनणार म्हणजे बनणारच, ही जागा अशी आहे जिथे पुन्हा पुन्हा यावेसे वाटते.
हिंदूंची एकता कायम राहिली पाहीजे पहिले मंदीर आणि मग संसद हे आम्ही आचरणातून दाखवून दिले आहे, उद्या संसदेचे कामकाज सुरू होत आहे. असे उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -