घरमहाराष्ट्रमुंबई-पुणे महामार्गावर दोन कारची टक्कर, ७ जण जागीच ठार

मुंबई-पुणे महामार्गावर दोन कारची टक्कर, ७ जण जागीच ठार

Subscribe

रविवारी दुपारी तीनच्या सुमारास मुंबई-पुणे महामार्गावर दोन भरधाव चारचाकींमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात ७ जणांचा जागीत मृत्यू झाला असून २ जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे.

रविवारी दुपारी तीनच्या सुमारास मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मृतांमध्ये ६ पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. कार्ला फाट्याजवळ मुंबईच्या दिशेने येणारी भरधाव स्विफ्ट पुण्याच्या लेनमध्ये घुसली आणि पुण्याला जाणाऱ्या लेनमधील सॅन्ट्रो कारला धडकली. या अपघातातील दोन गंभीर जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. समोरासमोर धडक झाल्याने या गाड्या चक्काचूर झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच लोणावळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भरधाव वेगात असलेल्या स्विफ्ट गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटले. स्वीफ्ट गाडी दुभाजक ओलांडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनमध्ये गेली. स्विफ्टने या लेनवरुन धावणाऱ्या सॅन्ट्रो गाडीला समोरून जोरदार धडक दिली या भीषण अपघातात सॅन्ट्रोमधील २ तर स्विफ्ट मधील ५ जणांचा मृत्यू झाला आहे. अद्याप अपघातातील मृतांची नावे कळू शकलेली नाहीत.

महामार्गावर कोंडी

अपघातामुळे मुंबई-पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी  झाली होती. पुण्याला जाणाऱ्या लेनवर लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक पोलीस  घटनास्थळी पोहोचून त्यांनी वाहतुक सुरळीत केली.

- Advertisement -

मदतकार्यात व्यत्यय

घटनेची माहिती मिळताच लोणावळा पोलीस तसेच वाहतूक पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मदतकार्य सुरू केले परंतु मुसळधार पावसामुळे मदत कार्यात अडचणी आल्या. दरम्यान, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -