घरताज्या घडामोडीमुंबई पोलिसांनी दिलेल्या नियमांचे उल्लंघन प्रकरण, एमआयएमच्या सहा पदाधिकार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई पोलिसांनी दिलेल्या नियमांचे उल्लंघन प्रकरण, एमआयएमच्या सहा पदाधिकार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल

Subscribe

मुंबई पोलिसांनी दिलेल्या नियमांचे उल्लंघन करून रॅलीचे आयोजन केल्याप्रकरणी एमआयएमच्या सहा पदाधिकार्‍यांविरुद्ध साकिनाका पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्यांत अद्याप कोणालाही अटक झाली नसून लवकरच संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी दोन दिवस 144 कलम लागू केले होते.

यावेळी कोणालाही राजकीय सभा, रॅली आणि मोर्चा काढण्यास बंदी घातली होती. ही बंदी असताना एमआयएमने मुस्लीम आरक्षण आणि वफ्क बोर्डाच्या जमिनीसंदर्भात एका रॅलीचे आयोजन केले होते. ही रॅली शनिवारी रात्री साकिनाका येथील चांदीवली परिसरात आली होती. रॅलीचे रुपांतर नंतर सभेत झाले होते. खासदार इम्तियाज जलील आणि एमआयएमचे अससुद्दीन ओवेसी यांचे भाषण झाले होते. त्यात हजारो मुस्लीम जमाव सामिल झाले होते. मुंबई पोलिसांनी या रॅलीसह सभेला परवानगी दिली नव्हती. तरीही एमआयएमने मुंबई पोलिसांनी दिलेल्या नियमांचे उल्लंघन करून सभेचे आयोजन केले होते. त्यामुळे रविवारी सकाळी सहा पदाधिकार्‍यांविरुद्ध साकिनाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -