घरमहाराष्ट्रनाशिकअर्धवेळ ग्रंथपालांच्या माहितीविषयी शिक्षण विभागच संभ्रमावस्थेत

अर्धवेळ ग्रंथपालांच्या माहितीविषयी शिक्षण विभागच संभ्रमावस्थेत

Subscribe
नाशिक :  गेल्या तीन वर्षापासून अर्धवेळ ग्रंथपालांना पूर्णवेळ करण्यासाठी कोणती माहिती आवश्यक आहे. हेच अजून शिक्षण विभागाला न समजल्याने दरवर्षी वेगवेगळी पत्रके काढून शिक्षण विभाग अर्धवेळ ग्रंथपालांची माहिती गोळा करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.
`शिक्षकेतर आकृतीबंध समितीने सुचविलेल्या शिफारशींचा आधी विचार न करता वेगळाच शासन निर्णय पारीत केला. राज्यातील साधारण १३५० कार्यरत अर्धवेळ ग्रंथपालांची अद्ययावत माहिती संचनालयाकडे जमा होत नाही ही बाब खेदजनक आहे. एकाच महिन्यात तीन पत्र ग्रंथपालांच्या माहितीसाठी काढले जात असल्यामुळे सर्व शिक्षण विभागच बुचकळ्यात पडल्याचे दिसत आहे. शिक्षणाधिकारीही वारंवार ही माहिती पाठवून वैतागले आहेत.
संचलनालयाच्या पत्रास लवकर शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून प्रतिसादही मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. एकही माहिती मुदतीत जमा होत नाही. त्यामुळे याचा थेट परिणाम कार्यरत अर्धवेळ ग्रंथपालांच्या मानसिकतेवर होत असून आयुष्यात पूर्णवेळ होण्याचे स्वप्न भंगण्याची भिती ग्रंथपालांमध्ये निर्माण झाली आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे ग्रंथालय शिक्षक विभागाचे अध्यक्ष विलास सोनार यांनी दिली आहे.  जी माहिती शिक्षण विभागाकडे संगणकाच्या सरल व शालार्थ प्रणालीच्या माध्यमातून एका क्लिकवर मिळू शकते तीच माहिती गोळा करण्यासाठी शिक्षण विभागाला एवढा आटापिटा करावा लागत आहे. माहिती संकलनात अडकले अर्धवेळ ग्रंथपालांचे पूर्णवेळ होण्याचे स्वप्न अशी स्थिती निर्माण झालेली आहे.
आकृतिबंध समितीने ७०० विद्यार्थी संख्येला एक पूर्णवेळ व दोन शाळा मिळून ७०० विद्यार्थी संख्येला पूर्णवेळ करण्याची शिफारस वित्त विभागाने मान्य करूनही शिक्षण विभागाने मात्र वेगळाच पर्याय शोधून काढून हा प्रश्न प्रलंबितच ठेवण्यासाठी कसर ठेवलेली नाही. राज्यातील कार्यरत अर्धवेळ ग्रंथपालांची सेवाज्येष्ठता यादी संचनालयाने जाहीर केलेली असून यामध्ये माहिती असूनही माहिती संकलन काही थांबत नाही.   या संदर्भात ग्रंथालय शिक्षक परीषेचे पदाधिकारी तानाजी कांबळे, पंडित वाघमारे, डी.एल.रासकर, संदीप गायकवाड यांची संचालकांशी भेट न झाल्याने त्यांनी कार्यालयात निवेदन दिले आहे.
Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -