घरमहाराष्ट्रCBIनं नरेंद्र दाभोलकरांच्या मारेकऱ्याला केली अटक

CBIनं नरेंद्र दाभोलकरांच्या मारेकऱ्याला केली अटक

Subscribe

औरंगाबादमधून डॉ. नरेंद्र दोभालकर यांच्या मारेकऱ्याला अटक करण्यात आली आहे. सीबीआयनं औरंगाबादमधून सचिन अणदुरे बेड्या ठोकल्या आहेत.

अंनिसचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी औरंगाबादमधून एकाला सीबीआयनं अटक केली आहे. सचिन अणदुरे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर जालन्यातून देखील एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. सचिन अणदुरे हा मुळचा औरंगाबादचा असून त्याला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. दरम्यान, नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्यापैकी सचिन अणदुरे हा एक असल्याचे देखील सीबीआयनं म्हटलं आहे. नालासोपारा स्फोटक प्रकरणात अटकेत असलेल्या शरद कळसकरनं दिलेल्या माहितीच्या आधारे सचिनला अटक करण्यात आली आहे. सचिन अणदुरेला चार दिवसांपूर्वीच अर्थात १४ ऑगस्टला अटक करण्यात आली आहे. यापूर्वी विरेंद्र तावडेला देखील नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी अटक केलेली आहे. त्यानंतर डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात झालेली ही दुसरी अटक आहे. यासंदर्भात महाराष्ट्र एटीएसनं माहितीपत्रक देखील जारी केली आहे. एटीएसनं दिलेल्या माहितीवरून सीबीआयनं सचिन अणदुरेला अटक केली आहे. २० ऑगस्ट २०१३ रोजी नरेंद्र दाभोलकर सकाळी ७ वाजून २० मिनिटांनी मॉर्निंग वॉक करता निघाले होते. त्यावेळी शनिवार पेठेत बालंगधर्व रंगमंदिराकडून ओंकारेश्वर मंदिराकडे जाणार्‍या पुलावर त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. बाईकवरून आलेल्या दोन तरूणांनी दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडून पलायन केले होते. त्यातच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा मृत्यू झाला होता.

वाचा – मुंबई एटीएसच्या कारवाईत वैभव राऊतनंतर आणखी दोघांना अटक

दाभोलकर हत्या प्रकरण आणि नालासोपारा कनेक्शन

९ ऑगस्ट रोजी ( गुरूवारी ) एटीएसनं नालासोपाऱ्यातील वैभव राऊतच्या घरातून स्फोटकं जप्त केली होती. त्याच प्रकरणात अटक करण्यात आलेल्या शरद कळसकरनं दिलेल्या माहितीवरून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येसंदर्भातील माहिती समोर आली. जवळपास १० दिवस चौकशी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेला सचिन अणदुरे ही नालासोपारा स्फोट प्रकरणात अटक करण्यात आलेल्या शरद कळसकरचा मित्र आहे. दरम्यान दोघेही औरंगाबादचे रहिवासी आहे.

- Advertisement -

सचिन अणदुरेची पार्श्वभूमि

सचिन अणदुरे हा मुळचा औरंगाबादचा रहिवासी आहे. त्याला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. सचिनला आई-वडील नाही आहेत. त्याला एक मोठा भाऊ आहे. मोठ्या भावाचं लग्न झाला असून त्याला दोन मुलं आहेत.

कलबुर्गी, पानसरेंच्या मारेकऱ्यांना अटक होणार?

दरम्यान, सचिन अणदुरेला अटक करण्यात आल्यानंतर आता एम. एम. कलबुर्गी आणि गोविंद पानसरेंच्या मारेकऱ्यांना देखील अटक होण्याची शक्यता आहे. शिवाय, सचिन अणदुरेच्या अटकेने अनेक गोष्टींचा उलगडा होण्याची आता दाट शक्यता आहे. विचारवंत एम. एम. कुलबर्गी आणि गोविंद पानसरे यांची देखील गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. शिवाय, पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात देखील अटक केलेल्या आरोपींचा काही संबंध आहे का? या दृष्टीने देखील आता चौकशी केली जाणार आहे.

वाचा – वैभव राऊतचा सनातनशी संबंध तपासानंतरच कळेल – दीपक केसरकर
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -