घरमहाराष्ट्रनाशिकमहापुरूषांच्या जयंतीला डिजे, नाचगाण्याला फाटा देत नोकरी महोत्सव भरवा; भुजबळांचे आवाहन

महापुरूषांच्या जयंतीला डिजे, नाचगाण्याला फाटा देत नोकरी महोत्सव भरवा; भुजबळांचे आवाहन

Subscribe

नाशिक : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त रोजगार महोत्सव होत असून अजित पवारांचा वाढदिवस दररोज आला पाहिजे, म्हणजे असा नोकरी महोत्सव भरवता येईल. अशा उपक्रमांचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला आयोजित केला पाहिजे. एक दिवस डिजे लावून कार्यक्रम न करता असा कार्यक्रम दररोज करा असे आवाहन पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई नाका येथील राष्ट्रवादी भवन येथे आयोजित या महोत्सवाचे उदघाटन छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलतांना भुजबळ म्हणाले की, उद्योग धंद्यांसंदर्भात काही करता येईल का, याचा विचार केला पाहिजे. यापूर्वी आपण अनेकांना कर्ज उपलब्ध करून दिले असून ७५ हजार युवकांना नोकरी देण्याचा मानस आहे. पूर्वीपेक्षा नाशिकमध्ये १५ ते २० वर्षात अमुलाग्र बदल झाला. नाशिक मुंबई रस्त्यात आता खडडे झाले असतील तरी मोठा रस्ता झाला असून त्र्यंबकेश्वर येथील रस्ता केला आहे. वणीला फ्युनिक्युलर ट्रॉली केली आहे. हा सगळा विकास पाहून लोक येतात. त्याचा शेतकर्‍यांना देखील फायदा होतो.

- Advertisement -

गंगापूर परिसरात बोट क्लब देखील सुरू केला असल्याने पर्यटकांसह उद्योजक हळूहळू येतात. जिल्हयात येणार्‍या उद्योगांमध्ये स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी पूर्वीपासून आग्रही आहे. शिवसेनेच्या धर्तीवर स्थानीय लोकाधिकार समिती स्थापन करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. शिवसेनेत असताना लोकाधिकार समिती स्थापन झाली. त्यावेळी आमच्या स्थानिक लोकांना रोजगार द्या अशी मागणी केली होती. जिल्हयात कुठे कुठे उद्योग येत आहेत त्यात आमच्या लोकांना रोजगार द्या, एका जागेसाठी १० जणांचे नावे द्या. यातून मोठा रोजगार निर्माण होईल असेही ते म्हणाले. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, देविदास पिंगळे, आ.दिलीप बनकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रविंद्र पगार, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, नाना महाले, बाळासाहेब कर्डक, अर्जुन टिळे, जिल्हा कार्याध्यक्ष गोरख बोडके, विष्णूपंत म्हैसधुणे, डॉ. शेफाली भुजबळ, समाधान जेजुरकर आदी उपस्थित होते.

५० हून अधिक कंपन्यांचा सहभाग

या नोकरी महोत्सवात पुणे, नाशिकमधील नामवंत कंपन्या उद्योग, वित्त, कॉर्पोरेट, सेवा या क्षेत्रातील सुमारे ५० हून अधिक कंपन्यांनी सहभागी होउन नोकरीसाठी उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतल्या. यात दहावी, बारावी, पदवीधर, आयटीआय, पॉलिटेक्निक, इंजिनिअर, पदवी यसह सर्वच विभागातील पात्रताधारक उमेदवारांनी सहभाग नोंदवला. जॉब फेअर इंडीया कंपनीने यासाठी सहकार्य केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -