घरमहाराष्ट्रबाजार समित्यांच्या माध्यमातून शेतकर्‍यांना एक लाख कोटी

बाजार समित्यांच्या माध्यमातून शेतकर्‍यांना एक लाख कोटी

Subscribe

केंद्रीय मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या दुसर्‍याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या नव्या मंत्रिमंडळासोबत बैठक घेतली. या बैठकीत बाजार समित्यांच्या माध्यमातून शेतकर्‍यांना एक लाख कोटी रुपये देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकारांना सांगितले.

माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया, कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी पत्रकार परिषदेत ही महिती दिली. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत 30 मंत्री सामील झाले होते.

- Advertisement -

पत्रकार परिषदेत कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर म्हणाले की, जगभरात नारळ व्यवसाय वाढवण्यावर भर दिला जाईल. यासह नारळ मंडळामध्ये सीईओची नेमणूक केली जाईल. एपीएमसी मंडई आणखी मजबूत करण्यात येतील. कृषी बाजारपेठेस अधिक संसाधने दिली जातील. सरकारच्या निर्णयामुळे शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढेल.

मोदी सरकार सतत शेतकर्‍यांच्या हिताची पावले उचलत आहे. आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना सांगायचे आहे की नवीन कृषी कायद्यामुळे बाजार समित्या संपतील हे पुन्हा पुन्हा सांगितले जाते. पण अर्थसंकल्पात असे स्पष्टपणे सांगितले गेले होते की बाजार समित्या संपणार नाहीत, तर त्या अधिक बळकट केल्या जातील. आज एपीएमसी (कृषी उत्पन्न बाजार समिती) कृषी पायाभूत सुविधा निधी वापरण्यास सक्षम होईल, असा निर्णय घेण्यात आला.

- Advertisement -

आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया यांनी सांगितले की, कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी आरोग्य आपत्कालीन परिस्थितीसाठी 23 हजार कोटींचे पॅकेज दिले जाणार आहे. यामध्ये 15 हजार कोटी केंद्र सरकार देईल, तर 8 हजार कोटी राज्य सरकारांकडून उभे केली जातील. कोरोनाच्या संभाव्य धोक्यात लहान मुलांना या पॅकेजमधून सहाय्य केले जाईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -