घरमहाराष्ट्रनाशिकभाजपसह महाविकास आघाडीला ‘टोईंग’चा फटका

भाजपसह महाविकास आघाडीला ‘टोईंग’चा फटका

Subscribe

कालिदास कलामंदिर परिसरातrn १०८ वाहनांवर कारवाई

महापालिकेतर्फे गुरुवारी (दि.८) आयोजित करण्यात आलेल्या बससेवा शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी कालिदास कलामंदिर परिसरात भाजपसह महाविकास आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह नागरिकांना टोईंगचा फटका बसला. अनेकांनी जागा भेटेल त्या ठिकाणी वाहने पार्क केली होती. मात्र, या ठिकाणी टोईंगवाल्याने नो-पार्किंगमध्ये वाहने असल्याची संधी साधत भरघोस कमाई केली. वाहने पार्किंग ठिकाणी नसल्याने वाहनचालकांनी विचारपूस केली असता वाहन टोईंग केल्याचे समजले. आधीच या ठिकाणी काम सुरु असल्याने रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे.

कार्यक्रमस्थळी पार्किंगची व्यवस्था महापालिकेने उपलब्ध का करून दिली नाही, टोईंगवाल्याने इतर ठिकाणी कारवाई करण्याऐवजी या ठिकाणीच कमाईची संधी साधली का, असा प्रश्न वाहनचालकांनी उपस्थित केला आहे. बेशिस्त पार्किंग वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहर वाहतूक शाखेकडून टोईंग मोहीम सुरु करण्यात आली. गुरुवारी (दि.८) दुचाकी उचलण्यासाठी शहरातील रस्त्यांवर आयशर मालट्रक धावताना दिसून आले. दिवसभरात ७२ दुचाकी व ३६ चारचाकी वाहने असून, एकूण १०८ वाहनांवर कारवाई करण्यात आली. नो-पार्किंगमधील वाहनांवर टोईंग कारवाई करण्याअगोदर तीन मिनिटांऐवजी कमी वेळ प्रतीक्षा करत वाहने उचलून मालट्रकमध्ये भरण्यावरच ठेकेदाराचे कर्मचारी भर देताना दिसून आले. बससेवा शुभारंभ कार्यक्रमप्रसंगी विविध पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह नागरिकांनी कालिदास कला मंदिर परिसरात पार्किंग जागेअभावी जागा भेटेल त्या ठिकाणी वाहने पार्क केली. ही संधी साधत टोईंगवाल्याने वाहनांवर कारवाई करत कमाई केली. या कारवाईमुळे अनेक वाहनचालकांची धावपळ झाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -