घरमहाराष्ट्रMaratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात महाराष्ट्रातील खासदारांची नवी दिल्लीत एकत्रित बैठक

Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात महाराष्ट्रातील खासदारांची नवी दिल्लीत एकत्रित बैठक

Subscribe

नवी दिल्ली : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी राज्यभर दौर करत आहेत. तर दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास छगन भुजबल यांच्यात वाद सुरू आहेत. मात्र महाराष्ट्रात ऐरणीवर असलेला मराठा आरक्षण या विषयी महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी एकमताने संसदेत आवाज उठवावा, याकरिता छत्रपती संभाजीराजे यांनी दिल्ली येथे राज्यातील सर्व लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची संयुक्त बैठक आयोजित केली आहे.

सोमवारी (ता.18 डिसेंबर ) सायंकाळी 5.00 वाजता महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे होणाऱ्या बैठकीला संभाजीराजे यांच्याकडून राज्यातील सर्व लोकसभा व राज्यसभा खारदारांना निमंत्रित करण्यात आले आहे. या बैठकीसाठी शरद पवार, नितीन गडकरी, नारायण राणे, रामदास आठवले, सुप्रिया सुळे यांच्या सारखे बडे खासदार उपस्थित राहणार का हे पाहणं महत्त्वाच आहे.

- Advertisement -


मराठा समाजाला आरक्षण द्यावे यासाठी मनोज जरांगे पाटील उपोषण केलं. त्यानंतर त्यांनी मराठा समाजाला 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण द्यावे, अन्यथा त्याचे वाईट परिणाम होतील, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. जर 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण मिळालं नाहीतर मुंबईतील मंत्रालयावर मोर्चा धडकणार असल्याचे त्यांनी सांगितलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -