घरमहाराष्ट्रमुख्यमंत्रीपदाचा स्वप्नातही विचार केला नव्हता पण...; उद्धव ठाकरेंनी सांगितला तो किस्सा

मुख्यमंत्रीपदाचा स्वप्नातही विचार केला नव्हता पण…; उद्धव ठाकरेंनी सांगितला तो किस्सा

Subscribe

मुंबईतील एका कार्यक्रमात महाविकास आघाडीतील प्रमुख तीन पक्षाचे नेते उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले यांची उपस्थिती होती.

मुंबई : मी मुख्यमंत्री होईल असा स्वप्नातही विचार केला नव्हता पण त्याला जबाबदार शरद पवार आहेत असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी 2019 च्या महाविकास आघाडीवेळी घडलेला तो किस्सा सांगत हशा पिकवला. ते सोमवारी (6 नोव्हेंबर) रोजी मुंबईत आयोजित एका कार्यक्रमा दरम्यान बोलत होते. (Chief Ministers post was not even thought of in his dreams but… Uddhav Thackeray told that story)

मुंबईतील एका कार्यक्रमात महाविकास आघाडीतील प्रमुख तीन पक्षाचे नेते उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आज अंधार जरी पसरला असला तरी वणवा पेटविण्यासाठी एक ठिणगी पुरेसी असते. आणि ठिणगीसारखे काम लेखक करतायेत. आपण वर्णन फार छान करतो, लोकशाहीचा चौथा स्तंभ, परंतू सत्ताधाऱ्यांच्या वाळवीने त्याला पोखरून टाकलेले आहे. त्या वाळवीने चौथा स्तंभ पोखरून टाकला आहे. असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार प्रहार केला. तर पुढे बोलताना ते म्हणाले की, आधी हिडीस शब्द वापरल्या जात होता. आता नवीन शब्द आला आहे. ईडीस, सध्या ईडीस कारभार सुरू आहे. तर आमचे दुसरे काहीच म्हणणे नाही फक्त आमचे एकच म्हणणे आहे की, समान एका कायद्याने वागवा. तर यावेळी नाना पटोले यांना उद्देशून ते म्हणाले की, आपण कशा चौकशा लावल्या होत्या. त्या आता बंद करून सगळ्या क्लीनचिट देण्यात आली आहे. हे सरकार क्लीनचिटर सरकार असल्याचे म्हणत उद्धव ठाकरेंनी विद्यमान सरकारवर हल्लाबोल केला. तर आता भुपेश बघेलांवर महादेव बॅटींग अॅपचा आरोप लावला आहे. ते काही भाजपमध्ये जाणार नाहीत, पण गेलेच तर महादेव अॅपचे हरहर महादेव होऊन जाईल असे म्हणत त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर हल्ला चढवत एवढं सगळं सुरू असताना आपण गप्प का राहत आहोत असे म्हणत उपस्थितांना प्रश्न विचारला.

- Advertisement -

हेही वाचा : सूनबाई भाजप, मुलगा अजित पवार समर्थक अन् सासूबाई BRSमधून झाल्या सरपंच; वाचा काय आहे प्रकरण?

मेरा अमरावतीसे बहुत पुराना रिश्ता है

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मेरा अमरावतीसे बहुत पुराना रिश्ता है, हो खरच. मी फेकाफेकी करत नाही. कारण, माझी आजी अमरावती जिल्ह्यातील परतवाड्याची म्हणून माझे अमरावतीशी खूप जुने नाते आहे. जे नाते आहेत ते आहेत जे नाहीत ते नाहीत. प्रबोधनकार आम्हाला ते त्या्ंच्या आयुष्यातील काही गोष्टी सांगत होते. सध्या प्रवाहासोबत वाहत जाणारे अनेक आहे पण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने काहीच जण जातात. त्यामुळे सध्या प्रवाह वळवण्याची सध्या गरज आहे. जर प्रबोधनकार व्हायचे असेल तर निर्भीड व्हावे लागणार आहे. आता शिवसेना प्रमुखांचा फोटो चोरून पक्ष चालवत आहेत. त्यांना ना नेता ना विचार, आचार, काही दीशा. आम्हाला ना काही जिंकायचे आणि काही हारायचे पण जे काही चालले ना ते बघवत नाही मला हे बदलली पाहीजे म्हणून ढोंगावरती लाथ अशी भूमिका प्रबोधनाकारांची होती. ती आमचीसुद्धा आहे. आज प्रबोधनकार हवेसे वाटतात पण पेलवत नाहीत. महात्मा फुले, आंबेडकर यांना काय हवं होतं ते देत गेले आणि घडत गेलं. असे म्हणत त्यांनी प्रबोधनकारांच्या विचारांना उजाळा दिला.

- Advertisement -

हेही वाचा : “बीडसह अंतरवालीच्या घटनांची SIT चौकशी करावी”, मनोज जरांगे पाटलांची सरकारकडे मागणी

हीच माझ्या आयुष्याची कमाई

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी खूप विषयाचा अभ्यास केला पण ज्या विषयात रमलो त्या विषयाचा कधीच अभ्यास केला नाही. मी स्वप्नातसुद्धा मुख्यमंत्री होण्याचा विचार केला नव्हता पण झालो, त्याला शरद पवार जबाबदार आहेत. पण जे जमेल ते मी केलं. आणि तुम्ही मला स्वीकारलं. आज मला जो कुटुंबात मान मिळाला आहे तीच माझी कमाई आहे असे प्रतिपादन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -