घरक्राइमकल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याच्या जागेचा वंशज असल्याचा दावा, आरोपी 'बंटी' विरोधात गुन्हा दाखल

कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याच्या जागेचा वंशज असल्याचा दावा, आरोपी ‘बंटी’ विरोधात गुन्हा दाखल

Subscribe

कल्याण पश्चिम येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दुर्गाडी किल्ल्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका बंटीने म्हणजेच फसवणूक करणाऱ्या इसमाने बनावट कागदपत्र तयार करून किल्ल्याची जागा स्वतःच्या नावावर केल्याची माहिती उघडकीस आली आहे.

कल्याण : कल्याण पश्चिम येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दुर्गाडी किल्ल्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका बंटीने म्हणजेच फसवणूक करणाऱ्या इसमाने बनावट कागदपत्र तयार करून किल्ल्याची जागा स्वतःच्या नावावर केल्याची माहिती उघडकीस आली आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात विविध कलमानुसार महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपीने स्वतःला किल्ल्याच्या जागेचा वंशज असल्याची बतावणी देखील केल्याचे सांगण्यात आले आहे. सुयश शिर्के (सातवाहन) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. सुयश हा माळशेज नाणेघाट आणि इतर वनक्षेत्र आणि पर्यटक स्थळ विकास समितीचा अध्यक्ष असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. सदर घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. (Claiming to be descendant of Durgadi fort site in Kalyan, case has been registered against accused)

हेही वाचा – रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुक; प्रचाराच्या तोफा थंडावल्या

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, सुयश याने कल्याण मधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्लाच्या जागेचे वंशज असल्याचे दाखूवन बनावट कागदपत्रांच्या आधारे किल्ल्याची जागा स्वतःच्या नावावर करून घेतली. त्याने साधारणतः वर्षभरापूर्वी म्हणजेच 12 सप्टेंबर 2022 रोजी किल्ल्याची जागा आपल्या नावाने करण्यासाठी नाहरकत दाखल्यासाठी अर्ज दिला होता. या अर्जात त्याने शिर्के (सातवाहन) राजाचे वंशज आणि वारसदार असल्याचा उल्लेख करत कल्याण तहसील कार्यालयातील 5 ते 7 कागदपत्रांवर शिक्के आणि अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या असलेले कागदपत्रे अर्जसोबत जोडले होते. सदरच्या जागेचे प्रकरण ऐतिहासिक किल्ल्याविषयी असल्याने मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यलयात पाठविण्यात आले होते.

त्यानंतर मध्यंतरी या किल्ल्याची पडझड झाल्याने या किल्ल्याची दुरुस्ती करता यावी, यासाठी स्थानिक बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ठाणे जिल्हा अधिकारी कार्यलयाशी पत्र व्यवहार केला. या पत्र व्यवहाराच्या माध्यमातून त्यांनी किल्ल्याच्या संदर्भातील सर्व माहिती ही लेखी स्वरुपात मागवली होती. परंतु, या जागेचे वंशज हे सुयश शिर्के (सातवाहन) असल्याने त्यांच्याकडून दुरुस्तीची परवानगी घ्यावी, असे ठाणे जिल्हा अधिकारी यांच्याकडून पोलिसांना कळविण्यात आले होते. मात्र कल्याण मंडळ अधिकारी कार्यलयात या किल्ल्याच्या जागे संदर्भात 24 फेब्रुवारी 2023 रोजी दस्तऐवज तपासण्यात आले. यावेळी कल्याण तहसीलदार कार्यालयाच्या नावाने बनावट लेटरसह अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी केलेले दस्तऐवज देखील आढळून आल्याने हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला.

- Advertisement -

हे खळबळजनक प्रकरण उघडकीस आल्यानंतर 2 नोव्हेंबर रोजी कल्याण तहसीलदार कार्यालयातील मंडळ अधिकारी प्रीती घोडे यांच्या तक्रारीनंतर कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्यात सुयश शिर्के नामक व्यक्तीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास केल्यानंतर शिर्के हा माळशेज नाणेघाट व इतर वनक्षेत्र आणि पर्यटकस्थळ विकास समितीचा अध्यक्ष असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या या आरोपीचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे. तर चक्क दुर्गाडी किल्ल्याच्या जागेचा वंशज असल्याचा दावा करून हा फसवणुकीचा प्रकार करणाऱ्या आरोपी सुयश शिर्केबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -