घरमहाराष्ट्रभाजपा नेते मोहित कंबोज यांना दोन प्रकरणांत क्लीनचिट

भाजपा नेते मोहित कंबोज यांना दोन प्रकरणांत क्लीनचिट

Subscribe

Mohit Kamboj | राज्यात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे राजकीय वातावरण विविध मुद्द्यांवरून तापले आहे. अशातच भाजपा नेत्याला क्लीनचिट मिळाले आहे. याचे पडसाद आता विधिमंडळातही उमटण्याची शक्यता आहे.

मुंबई – भाजपाचे नेते मोहित कंबोज यांना आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी क्लीनचिट मिळाली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या कार्यकाळात कंबोज यांच्यावर आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले होते. या गुन्ह्यामध्ये मोहित कंबोज यांना दिलासा मिळाला आहे. तसंच, आर्म्स अॅक्ट अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांतही त्यांना क्लीनचिट मिळाली आहे.

राज्यात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे राजकीय वातावरण विविध मुद्द्यांवरून तापले आहे. अशातच भाजपा नेत्याला क्लीनचिट मिळाले आहे. याचे पडसाद आता विधिमंडळातही उमटण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कर्ज बुडवल्याप्रकरणी भाजपा नेते मोहित कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल

दरम्यान, क्लीनचिट मिळाल्यानंतर मोहित कंबोज यांनी ट्वीट करत मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी न करना, पहले भी कई तूफानों का रुफ मोड चुका हू! असं ट्वीट करत विरोधकांवर निशाणा साधला आहे.

- Advertisement -


नेमके प्रकरण काय?

2011 ते 2015 या कालावधीत मोहित कंबोज यांच्या कंपनीने इंडियन ओव्हरसीज बँकेकडून (Indian Overseas Bank) 52 कोटी रुपयांचे कर्ज (Loan) घेतले होते. पण कंबोज यांनी कर्ज ज्या कारणासाठी घेतले होते, त्यासाठी त्याचा वापर न करता ती रक्कम इतर ठिकाणी वापरण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. कंबोज यांनी हे 52 कोटींचे कर्ज बुडवले होते. याप्रकरणी कंबोज आणि त्यांच्या कंपनीच्या दोन संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. फसवणूक व कट रचल्याचा त्यांच्याविरोधात आरोप ठेवण्यात आला.

बॅंक इश्यूज काढून माझ्यावर गुन्हा दाखल

“मला कळाले मुंबई पोलिसांनी माझ्याविरोधात एफआयआर दाखल केली आहे. एक जुनी कंपनी जी 2017 मध्ये बंद झाली आहे. त्याचे बॅंक इश्यूज काढून माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. मला असं वाटतं की, महाविकास आघाडी सरकार असे करून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असेल किंवा मला धमकावण्याचा प्रयत्न करत असेल तर तसे होणार नाही. हे नवाब मलिकांचे काम असेल किंवा संजय राऊतांचे काम असेल तर मी याच्याविरोधात कोर्टात कायदेशीर लढा देईन. आम्ही याला घाबरणार नाही”, असे कंबोज यांनी म्हटले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -