घरमहाराष्ट्रमुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शाळा-कॉलेजला गुरुवारी सुट्टी, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शाळा-कॉलेजला गुरुवारी सुट्टी, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

Subscribe

राज्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने आपत्ती व्यवस्थापन विभागांना सूचना देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आली आहे.

मुंबई : मुंबईसह राज्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आल्यामुळे ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी येथील शाळा-कॉलेजना बुधवारी  सुट्टी देण्यात आली होती. आता हवामान विभागाने उद्या, गुरुवारीही पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे सांगितल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईसह उद्याही ठाणे, पालघर, रायगडमधील शाळा-कॉलेजना सुट्टी जाहीर केली आहे.

राज्यामध्ये आज सकाळपासूनच पावसाने जोर धरला आहे. यामुळे अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्यामुळे आता NDRF आणि SDRF पथके तैनात करण्यात आली आहे. राज्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने आपत्ती व्यवस्थापन विभागांना सूचना देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आली आहे. तसेच विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या संपर्कात राहून प्रत्येक जिल्ह्याची माहिती घेण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आले आहे. (CM Eknath Shinde’s advice to disaster management in the wake of heavy rains)

- Advertisement -

हेही वाचा – Central Railway : मध्य रेल्वे डोंबिवलीपर्यंत सुरू; सर्व स्थानकांवर चाकरमान्यांची तुडुंब गर्दी

याबाबत प्रसार माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, आज सकाळपासून आपले विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्यसचिव या सर्वांना सूचना दिलेल्या आहेत. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने आपात्कालीन यंत्रणा यांना अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे, अशा ठिकाणावरील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

- Advertisement -

त्याचप्रमाणे कोणत्याही परिस्थितीत नागरिकांची गैरसोय होणार नाही. नागरिकांना त्रास होणार नाही. कोणतीही जीवितहानी होऊ नये, यासाठी सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेल्या आहेत. शासनाची सर्व यंत्रणा, जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर असून योग्य उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. तर राज्यात ज्या ठिकाणी पाणी साचले आहे अशा ठिकाणी NDRF तुकड्या पाठविण्यात आल्या आहेत. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

IMD ने यलो आणि ऑरेंज अलर्ट दिला असल्या कारणाने प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. ज्याप्रमाणे प्रशासनाकडून काळजी घेण्यात येत आहे. त्याचप्रमाणे नागरिकांनी महत्त्वाच्या कामाशिवाय घराच्या बाहेर पडू नये, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आले आहे. तर ठाकुर्ली-कल्याण दरम्यान नाल्यात वाहून गेलेल्या चार महिन्याच्या बाळाबद्दल मुख्यमंत्र्यांकडून दुःख व्यक्त करण्यात आले आहे. पावसाचा जोर वाढल्याने मुख्यमंत्री शिंदे हे अॅक्शन मोडवर आले असून त्यांनी पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला भेट देवून परिस्थितीचा आढावा घेतला.


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -