घरमहाराष्ट्रतर खबरदार ! तुम्‍हाला सोडणार नाही

तर खबरदार ! तुम्‍हाला सोडणार नाही

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा इशारा

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर, टीकटॉकसारख्या माध्यमातून काहीजण करोनासंदर्भातले व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्यामध्ये करोनाचा संबंध एनआरसीशी जोडणे, नोटांना नाक पुसणे, थुंकणे असे प्रकार दाखवणारे व्हिडिओ व्हायरल झाले होते. हे व्हिडिओ बनवणार्‍यांना लागलीच अटक देखील करण्यात आली आहे. मात्र, अशा प्रकारे समाजासमाजात दुफळी माजवणार्‍यांना आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कडक इशारा दिला आहे.

‘मी कृपा करून, विनंती करतो, आवाहन करतो असे नेहमी म्हणतो ते संयमाने घरात राहणार्‍या लोकांसाठी आहे. त्या महाराष्ट्रातल्या जनतेला वाचवण्यासाठी मी कोणतेही पाऊल उचलू शकतो, कुठल्याही थराला जाऊ शकतो. जर कुणी याचा दुरुपयोग करून नोटांना थुंकी लावून पसरवणे, इशारे देणे असा प्रकार केला, तर तुम्हाला माझ्या कायद्याच्या कचाट्यातून कुणीही वाचवू शकणार नाही. आपल्या एकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न मी सहन करणार नाही’, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. शनिवारी दुपारी मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.काही प्रमाणात महाराष्ट्रात केसेस वाढत आहेत. आपण चाचण्यांची संख्या वाढवली आहे. त्यामुळे ही संख्या वाढते आहे. सापडलेल्या एकूण रुग्णांपैकी ५१ जण बरे होऊन घरी गेले.

- Advertisement -

यात ज्येष्ठ नागरिक किंवा इतर व्याधी असलेल्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. आपल्या ज्येष्ठ कुटुंबीयांची काळजी घ्यायची आहे’.या संवादादरम्यान मुख्यमंत्र्यांनी आराध्या नावाच्या एका ७ वर्षांच्या मुलीचं कौतुक केलं. ‘आराध्या नावाच्या एका चिमुकलीचा आज वाढदिवस आहे. आराध्याला महाराष्ट्राच्या वतीने आशीर्वाद. तुझं कौतुक..तुझा ७ वा वाढदिवस आहे. हट्ट करण्याचं वय आहे. पण आराध्यानं जनतेसमोर वेगळा आदर्श ठेवला आहे. तिनं आपल्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत केली आहे. ही समज जर एका ७ वर्षांच्या मुलीमध्ये आहे, तर आपण हे युद्ध जिंकलंय’.‘दिल्लीच्या निजामुद्दीनमधून तबलिगी जमातच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांपैकी महाराष्ट्रात आलेल्या सगळ्यांचा शोध लावण्यात आला आहे’ अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. ‘त्या सर्वांचा शोध घेण्यात आलेला आहे. त्यांना विलगीकरण कक्षात ठेवलं आहे.

त्यापुढे जर कुणाला अशा कुठल्या व्यक्तीविषयी माहिती असेल, तर त्यांनी पुढे येऊन सांगावं’, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. तसेच, ‘पुढच्या सूचना येईपर्यंत महाराष्ट्रात कोणताही धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम होणार नाही. सर्व धर्मियांनी, पंथियांनी, समाजांनी त्यांचे कार्यक्रम घरातच करावेत’, असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -