घरमहाराष्ट्रसेवा काय देता, सरळ गोळ्या घाला!

सेवा काय देता, सरळ गोळ्या घाला!

Subscribe

तबलीगवर राज ठाकरेंचा संताप

करोनाग्रस्तांच्या रुग्णालयात डॉक्टरांना दिल्या जाणार्‍या असभ्य वागणुकीबद्दल मरकज येथील तबलीगांना गोळ्या घालून ठार मारले पाहिजे. मुसलमानांमधील काही अवलादी आहेत त्यांना आत्ताच ठेचले पाहिजे. निवडणुकीच्या वेळी कुणाला मतदान करावे असे सांगायला येणारे मुल्ला मौलवी आहेत कुठे? असा संताप दिल्लीमधील निझामुद्दीन येथील तबलीग मरकजच्या कार्यक्रमावर बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी व्यक्त केला आहे.

मुंबईत कृष्णकुंजवर आपल्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.‘मरकजच्या लोकांसाठीवेगळा विभाग उभा करावा आणि त्यांचे वैद्यकीय उपाचर बंद करायला हवे. यांना या दिवसांमध्येही देशापेक्षा धर्म मोठा वाटत असेल आणि आम्ही देश संपवू असे कारस्थान करायचे असेल म्हणूनच ते नोटांना थुंका लावत आहेत, भाज्यांवर थुंकत आहेत. नर्सेससमोर नग्न फिरत आहेत. अशा लोकांना फोडून काढतानाचे व्हिडिओ व्हायरल करायला हवेत तरच लोकांना विश्वास बसेल. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे येऊन बोलायला पाहिजे. धर्म वैगेरे गोष्टी बोलायची ही वेळ नाही, पण मुसलमानांमधील काही अवलादींना आत्ताच ठेचलं पाहिजे.लॉकडाऊन आता आहे, नंतर आम्ही आहोतच, असा इशाराही राज यांनी दिला.

- Advertisement -

‘हा जो लॉकडाऊन आहे तो गांभीर्याने घ्यावा. लोकांना रेशन, भाजीचे असे अनेक प्रश्न पडले आहेत. अनेक ठिकाणी सरकार उपलब्ध करून देत आहे, पण मला भीती एका गोष्टीची आहे ती म्हणजे जर लॉक़डाऊन वाढवला तर त्याचे गंभीर परिणाम होतील. सरकारकडे कोणताही कर येणार नाही. उद्योगधंद्यावर परिणाम होतील. आधीच ५० टक्क्यांवर पगार आणले आहेत. जितके दिवस वाढवू तसा परिणाम होत जाणार. शिस्त पाळली जाणार नाही तर अर्थसंकट निर्माण होईल. मोदी यावर काहीतरी बोलतील अशी अपेक्षा होती’, याकडे राज यांनी लक्ष वेधले.

मोदींवर टीका
‘ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ५ एप्रिलला दिवे लावण्यास सांगितले आहे. लोक काळोख करतीलही, नाही तरी घरात बसून काय करायचे आहे. श्रद्धा किंवा अंधश्रद्धेचा विषय असेल, पण त्याच्याने काही होणार असेल तर त्याने परिणाम होऊ देत, पण नुसतं दिवे घालवून, मेणबत्त्या पेटवून, टॉर्च लावून याऐवजी पंतप्रधानांच्या भाषणात आशेचा किरण जरी दिसला असता तरी लोकांना समाधान वाटले असते. देश म्हणून आपण कुठे चाललो आहोत, पुढे काय घडणार आहे लोकांना कळले असते. उद्योगधंद्यांना काही दिलासा दिला नाही, तर उद्या नोकर्‍यांवर परिणाम होईल’, अशी टीका राज यांनी केली.

- Advertisement -

१४ तारखेला सर्व सुरळीत होईल असं मला वाटत नाही
‘जर अशा प्रकारे लोक वागत राहिले आणि करोनाचे रुग्ण वाढत राहिले तर लॉकडाऊन वाढवावाच लागेल. १४ तारखेला सर्व सुरळीत होईल असं मला वाटत नाही. सगळे घऱात थांबले तरच वैद्यकीय कर्मचारी, महापालिका कर्मचार्‍यांना माहिती मिळण्यास मदत होईल. ते काय जेलमध्ये टाकणार नाहीत. इतरांना त्रास होऊ नये यासाठी लोकांनी पुढे यायला पाहिजे. यामध्ये लपवण्यासारखं काही नाही. मला वाटतं समाजावर सर्वात मोठी जबाबदारी आहे. नुसतं सुशिक्षित असून चालत नाही, सुज्ञ पण असावं लागतं’,असा टोला राज यांनी मारला.

पोलिसांवर हल्ले करणार्‍यांना फोडून काढलं पाहिजे
‘पोलिसांवर हल्ले कऱणार्‍यांवर फक्त केसेस टाकून चालणार नाही तर यांना फोडून काढलं पाहिजे. त्याचे व्हिडिओ व्हायरल केले पाहिजेत. मी एक व्हिडिओ पाहिला ज्यामध्ये घरातील लोकांनी मिळून पोलिसांना मारलं. भेंडी बाजारमध्ये पोलिसांना शिव्या घातल्या जात असतानाचा एक व्हिडिओ आला. मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की, यावर कडक पावलं उचलावी लागतील. याचा संदेश संपूर्ण समाजभर जाण्याची गरज आहे. हे लपून छपून करण्यासारखं नाही. ज्याप्रकारे हे लोक वागत आहेत त्यांना काय प्रकारची शिक्षा मिळत आहे हे सर्वांना कळणं गरजेचं आहे, असे राज म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -