घरमहाराष्ट्रमुख्यमंत्री माझ्यावर पाळत ठेवतायत; नाना पटोलेंचा गंभीर आरोप

मुख्यमंत्री माझ्यावर पाळत ठेवतायत; नाना पटोलेंचा गंभीर आरोप

Subscribe

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गेले काही दिवस त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. दरम्यान, पुन्हा एकदा खळबळजनक विधान केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझ्यावर पाळत ठेवत आहेत, असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला आहे. सत्तेत सोबत असले तरी मुख्यंत्रीपद, गृहमंत्रीपद त्यांच्याकडे आहे. ते मला सुखाने जगू देणार नाहीत असं, नाना पटोले म्हणाले. लोणावळ्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना नाना पटोले यांनी हे खळबळजनक वक्तव्य केलं आहे.

“महाराष्ट्रात काँग्रेस उभी राहत आहे हे त्यांना माहीत आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे. मी कुठे काय करतो ते सगळं त्यांना माहीत आहे. आयबीचा रिपोर्ट रोज मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सकाळी ९ वाजता त्यांच्या घरी नेऊन द्यावा लागतो. कुठे बैठका, आंदोलन सुरु आहे, काय परिस्थिती आहे याची माहिती द्यावी लागते. मी इथे आहे याचीही रिपोर्ट गेला असेल. रात्री ३ वाजता माझी सभा पार पडली हे कोणाला माहिती नसेल पण त्यांना माहिती आहे. कारण त्यांच्याकडे ती व्यवस्था आहे,” असं नाना पटोले म्हणाले.

- Advertisement -

मला काही सुखाने जगू देणार नाहीत

“सोनिया गांधींनी महाराष्ट्र काँग्रेसची भूमी असल्याचं सांगितलं आहे. आपल्याला सत्ता आणायची आहे. मी त्यांना आश्वासन देऊन आलो आहे,” असं नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं. “महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता आणायचा मानस मी केला आहे. कोणीही घाबरण्याचं कारण नाही. फोन टॅपिंगबद्दल मी विधानसभेत उल्लेख केला होता. मला काही सुखाने जगू देणार नाहीत. सत्तेत सोबत असले तरी मुख्यंत्रीपद, गृहमंत्रीपद त्यांच्याकडे आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे. हे त्यांना माहीत नाही का? ते कुठे ना कुठे आपल्याला पिंजऱ्यात आणायचा प्रयत्न करणार,” असं नाना पटोले म्हणाले.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -