घरताज्या घडामोडीभाषणादरम्यान अमोल मिटकरींना अर्धांग वायूचा सौम्य झटका, प्रकृती स्थिर

भाषणादरम्यान अमोल मिटकरींना अर्धांग वायूचा सौम्य झटका, प्रकृती स्थिर

Subscribe

माझ्या प्रकृतीत सुधारणा झाली असून स्वतःचा जीव धोक्यात घालून मला भेटाया येऊ नका - अमोल मिटकरी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रसिद्ध वक्ते अमोल मिटकरी यांना एका कार्यक्रमात व्यासपीठावर भाषण करत होते. भाषण करताना अर्धांगवायूचा सौम्य झटका आला यामुळे कार्यक्रमात सगळेच घाबरले होते. अमोल मिटकरी यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केल्यामुळे योग्य उपचारांमुळे त्यंच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली आहे. अमोल मिटकरी हिंगणा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आयोजित कार्यक्रमादरम्यान भाषण करत होते. मंचावर बोलत असताना अमोल मिटकरी यांचा आवाज बदलला आणि हावभाव बदल्यामुळे उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषदेचे सदस्य अमोल मिटकरी हिंगणा येथील कार्यक्रमात उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक आणि चित्रपट आघाडीच्या विदर्भ संयोजक गायिक वैशाली माडे यांनी सुद्धा उपस्थिती लावली होती. अमोल मिटकरी यांनी व्यासपीठावरुन भाषण केलं आणि लोकशाहीर अण्णभाऊ साठेंची माझी मैना गावाकडे राहिली गीत गायला सुरुवात केली. मिटकरी यांनी गायला सुरुवात केल्यानंतर त्यांचा आवाजाचे स्वर बदलले त्यांचे तोंडाचे हावभाव बदलल्याचे पाहिल्यानंतर उपस्थित पदाधिकाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं. आयकॉन रुग्णालयात मिटकरींवर उपचार करण्यात आला.

- Advertisement -

अमोल मिटकरी यांनी उपाचारनंतर स्वतःच प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. माझ्या प्रकृतीत सुधारणा झाली असून स्वतःचा जीव धोक्यात घालून मला भेटाया येऊ नका अशी विनंती अमोल मिटकरी यांनी केली आहे. प्रकृती उत्तम असून चिंता करण्याचे कारण नसल्याचेही मिटकरींनी म्हटलं आहे.

- Advertisement -

फडणवीसांवर घणाघात

अमोल मिटकरी यांनी ओबीसी आरक्षणावरुन टीका करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर दिल होतं, देवेंद्र फडणवीस यांच गलिच्छ राजकारण महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघतोय. ज्या पद्धतीने OBC च्या नेतृत्वाचे पंख छाटण्याचं काम सुरु आहे त्याची परतफेड जनता येणाऱ्या काळात करेलचं. तुम्हाला स्वतंत्र ओळख नव्हती, त्यामागे मुंडे साहेबांचा आशीर्वाद होता हे विसरू नका असा खोचक टोला अमोल मिटकरी यांनी लगावला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -