घरदेश-विदेशCoaching Centre Guidelines : 16 वर्षांखालील विद्यार्थ्यांचे क्लासेस बंद, 1 लाखापर्यंत दंड;...

Coaching Centre Guidelines : 16 वर्षांखालील विद्यार्थ्यांचे क्लासेस बंद, 1 लाखापर्यंत दंड; मार्गदर्शकतत्त्व जाहीर

Subscribe

नवी दिल्ली : शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार आता कोचिंग सेंटर 16 वर्षांखालील विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकणार नाहीत. तसेच चांगले गुण किंवा रँकची हमी देण्यासारखी दिशाभूल करणारी आश्वासने देखील कोचिंग सेंटरला आता देता येणार नाही. विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या वाढत्या घटना, आगीच्या घटना, कोचिंग संस्थांमधील सुविधांचा अभाव तसेच त्यांनी अवलंबलेल्या शिकवण्याच्या पद्धतींबाबत सरकारकडे आलेल्या तक्रारींनंतर शिक्षण मंत्रालयाने ही मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. ही तत्त्वे कोचिंग संस्थांचे नियमन करण्यासाठी आणि खासगी कोचिंग संस्थांची बेफाम वाढ रोखण्यासाठी, तसेच कायदेशीर चौकटीची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आहेत. (coaching center guidelines classes of students below 16 years closed fine up to 1 lakh Guidelines announced)

शिक्षण मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे की, कोणतेही कोचिंग सेंटर पदवीपेक्षा कमी पात्रता असलेल्या शिक्षकांची नियुक्ती करणार नाही. याशिवाय कोचिंग सेंटर पालकांना विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी, तसेच रँक किंवा चांगल्या गुणांची हमी देण्यासाठी यापुढे दिशाभूल करणारी आश्वासने देऊ शकत नाहीत. विशेष म्हणजे सेंटर 16 वर्षाखालील विद्यार्थ्यांची नोंदणी करू शकत नाहीत. कोचिंग सेंटरमध्ये विद्यार्थ्यांची नोंदणी आता माध्यमिक शाळेच्या परीक्षेनंतरच करता येणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – PM Modi Solapur : देशात पुन्हा मोदी सरकार जगाला विश्वास, तर महाराष्ट्रात डबल इंजिन सरकार – एकनाथ शिंदे

मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कोचिंग सेंटर त्यांच्या गुणवत्तेबद्दल, त्यांनी प्रदान केलेल्या सुविधा, कोचिंग सेंटर किंवा त्यांच्या सेंटरमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्याने मिळवलेले निकाल याबद्दल प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणताही दावा करणारी किंवा दिशाभूल करणारी जाहिरात प्रकाशित करू शकत नाहीत. कोचिंग सेंटर कोणत्याही शिक्षक किंवा व्यक्तीच्या सेवा नियुक्त करू शकत नाहीत. ज्यांना नैतिक गैरवर्तनाच्या कोणत्याही गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आले आहे. अशांना या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आवश्यक असलेली समुपदेशन प्रणाली असल्याशिवाय कोणत्याही कोचिंग सेंटरची नोंदणी केली जाणार नाही.

- Advertisement -

विद्यार्थी आणि पालकांसाठी समुपदेशन प्रणाली

कोचिंग इन्स्टिट्यूटची एक वेबसाइट असेल. ज्यामध्ये शिक्षक शिकवण्याची पात्रता, अभ्यासक्रम, पूर्ण होण्याचा कालावधी, वसतिगृह सुविधा आणि आकारले जाणारे शुल्क यांची तपशीलवार माहिती असेल. नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार कठीण स्पर्धा आणि विद्यार्थ्यांवरील शैक्षणिक दबावाच्या तणावापासून त्यांना दूर ठेवण्यासाठी कोचिंग सेंटरने पावले उचलली पाहिजेत आणि विद्यार्थ्यांवर अनावश्यक दबाव न टाकता त्यांना शिकवले पाहिजे. तसेच कोचिंग संस्थांनी विद्यार्थ्यांना संकटात आणि तणावपूर्ण परिस्थितीत सतत पाठिंबा देण्यासाठी तत्काळ हस्तक्षेप करण्याची यंत्रणा तयार करावी. याशिवाय एक समुपदेशन प्रणाली कोचिंग सेंटरने विकसित केली पाहिजे, जी विद्यार्थी आणि पालकांना सहज उपलब्ध होईल. हे सुनिश्चित करण्यासाठी सक्षम अधिकारीही पावले उचलू शकतात.

हेही वाचा – आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने तयार झालेली पहिली डॉक्युमेंट्री ‘झेंडे’

विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी तपशीलवार रूपरेषा

मागच्या वर्षी कोटामध्ये विक्रमी संख्येने विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यानंतर मार्गदर्शक तत्त्वांमध्ये विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी तपशीलवार रूपरेषा समोर आली आहे. विविध अभ्यासक्रमांचे शुल्क पारदर्शक व तर्कशुद्ध असावे आणि आकारलेल्या शुल्काच्या पावत्या देण्यात याव्यात, असे मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे. एखाद्या विद्यार्थ्याने मध्यंतरी अभ्यासक्रम सोडल्यास त्याचे उर्वरित कालावधीचे शुल्क परत करण्यात यावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -