घरमहाराष्ट्रPM Modi Solapur : देशात पुन्हा मोदी सरकार जगाला विश्वास, तर महाराष्ट्रात...

PM Modi Solapur : देशात पुन्हा मोदी सरकार जगाला विश्वास, तर महाराष्ट्रात डबल इंजिन सरकार – एकनाथ शिंदे

Subscribe

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (19 जानेवारी) सोलापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने सोलापुरातल्या कुंभारीत साकारण्यात आलेल्या रे नगर गृहनिर्माण संस्थेतील पंधरा हजार घरांचे लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पाडले. यावेळी कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, जगभरातून लोक दावोसमध्ये आले, कारण त्यांना गॅरंटी आहे की, देशात मोदी सरकार येणार आहे. तसेच महाराष्ट्रातही डबल इंजिनचे सरकार बनणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (PM Modi Solapur Modi government again in the country the world trust while in Maharashtra double engine government Eknath Shinde)

हेही वाचा – Sanjay Raut : पंतप्रधान मोदींच्या सोलापूर दौऱ्यावर राऊतांची टीका, म्हणाले – “जिथे राजकीय फायदा तिथेच…”

- Advertisement -

उपस्थितांना संबोधित करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी सांगितले होते की, मी भूमिपूजन करत आहे आणि या घरांची चावी देण्यासाठीही मीच येईल. हीच मोदी गॅरंटी आहे. संत तुकाराम महाराज यांनी म्हटलं आहे, ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले’ हा अभंग मोदींना तंतोतंत याठिकाणी लागू होतो आहे.  मोदींची गॅरंटी ही कागदावर नसते तर वास्तवात उतरते.

दावोसमध्ये 3 लाख 53 हजार कोटींचे एमओयू झाले आहेत. दीड लाखांपेक्षा जास्त एमओयूला स्वीकृती मिळाली आहे. दावोसमध्ये अनेक सीईओ, प्रशासकीय अधिकारी भेटले, सर्वांच्या ओठांवर फक्त एकच नाव होते, ते म्हणजे नरेंद्र मोदी. जगभरातून लोक दावोसमध्ये आले, कारण त्यांना गॅरंटी आहे की, देशात मोदी सरकार येणार आहे. तसेच महाराष्ट्रातही डबल इंजिनचे सरकार बनणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Boat Accident : धक्कादायक घटना; वडोदरामध्ये सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांची बोट उलटली, 14 जणांचा मृत्यू

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ग्लोबल लिडर, डायनॅमिक लिडर आहेत. दिलेला शब्द पूर्ण करणारे नेता अशी मोदींची जगात ख्यात निर्माण झाली आहे. महाराष्ट्राचीही मान मोदींमुळे वाढत आहे. अयोध्येत राम मंदिराचा शिलान्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला होता, आता तिथे राम मंदिरही बनले आहे. कोट्यवधी राम भक्तांचे स्वप्न नरेंद्र मोदींनी पूर्ण केले आहे. अबूधाबीमध्ये एक मंदिर बनत आहे, त्याचेही उद्घाटन पंतप्रधान मोदी करणार आहेत. रे नगरचे उद्घाटन आज मोदींच्या हस्ते होत आहे. मोदी गरीबांसाठी आशेचा किरण म्हणून आज काम करत आहेत, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -