घरताज्या घडामोडीBMC : वाद टाळण्यासाठी मुंबई महापालिकेच्या 30 प्रसूतिगृहांत “संवाद कौशल्य” प्रशिक्षण

BMC : वाद टाळण्यासाठी मुंबई महापालिकेच्या 30 प्रसूतिगृहांत “संवाद कौशल्य” प्रशिक्षण

Subscribe

मुंबई महापालिकेच्या प्रसूतिगृहाच्या ठिकाणी रुग्णाला उपचार देण्यावरून तेथील डॉक्टर, कर्मचारी आणि रुग्ण अथवा त्यांचे नातेवाईक यांच्यात क्षुल्लक, गंभीर कारणांवरून शाब्दिक चकमक होते. प्रसंगी शिवीगाळ, भांडणे होतात. कधीकधी तर सदर भांडणाचे पर्यावसन हाणामारी आणि रूग्णालयात तोडाफोडी होते. त्यावरून डॉक्टर संघटना संप पुकारतात. त्यामुळे रूग्णालयाचे आर्थिक नुकसान होते. तसेच, इतर गरीब, गरजू रुग्णांचे हाल होतात. हे सर्व घटनाप्रकार टाळण्यासाठी पालिका प्रशासन व टाटा सामाजिक संस्था संयुक्तपणे आपल्या प्रसूतिगृहातील अधिकारी व कर्मचारी यांना गर्भवती महिला रुग्णांशी उत्तम संवाद साधण्याबाबत धडे देणार आहे.

मुंबई महापालिका प्रसूतिगृहात गरोदर स्त्रिया आणि स्तनदा माता आणि प्रसूतिगृहातील अधिकारी व कर्मचारी यांच्यातील संवाद अधिक उत्तम व्हावा म्हणून मुंबई महापालिकेने पुढाकार घेतला आहे. प्रसूतिगृहात येणाऱया रूग्णांसोबत अधिक सौजन्य आणि समाधानपूर्वक संवादाचा भाग म्हणून अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला ‘सॉफ्ट स्किल’चे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

- Advertisement -

टाटा सामाजिक विज्ञान संस्था (टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस – TISS) या संस्थेद्वारे ‘वर्तन बदल संवाद’ प्रशिक्षणाचे पहिले सत्र नुकतेच घेण्यात आले. या प्रशिक्षणाचा एकूण 42 कर्मचा-यांनी लाभ घेतला आहे. जुलै व ऑगस्ट महिन्यात सर्व प्रसूतिगृहांमध्ये मिळून अशा प्रकारचे एकूण 58 प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात येणार आहेत.

मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व प्रसूतिगृहांमध्ये अशा प्रकारच्या कार्यशाळा घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांच्या सुचनेनुसार आणि टाटा सामाजिक विज्ञान (TISS) संस्थेने या प्रशिक्षणासाठी पुढाकार घेतला आहे.

- Advertisement -

पालिकेच्या 30 प्रसूतिगृहात वर्षभरात 17 हजार प्रसूती

मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खाते अंतर्गत 30 प्रसूतिगृहे आहेत व वर्षाला साधारणत: 17 हजार प्रसूती होतात, 8 हजार 600 शस्त्रक्रिया, 5 लाख 28 हजार बाह्यरुग्ण तपासणी होतात. प्रसूतिगृहांमध्ये एकूण कार्यरत अधिकारी आणि कर्मचारी यांची संख्या अंदाजे 1 हजार 800 आहे. प्रसूतिगृहातील कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी, रुग्णांशी सुसंवाद साधण्यासाठी संवाद कौशल्य कार्यशाळा (Behavior Change Communication) महत्त्वाची ठरणार आहे.

कर्मचार्‍यांचे ‘सॉफ्ट स्किल्स’ विकसित करण्याची सतत गरज

सार्वजनिक आरोग्य सुविधांचा लाभ घेणा-या लाभार्थ्यांसाठी आरोग्य कर्मचारी हा संपर्काचे पहिला घटक आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेशी विश्वास आणि संबंध निर्माण करण्यासाठी आरोग्य कर्मचा-यांची पहिली छाप अत्यंत महत्त्वाची आहे. आघाडीच्या आरोग्य कर्मचार्‍यांमध्ये सहानुभूतीपूर्ण आणि सर्वसमावेशक वृत्ती सुनिश्चित करण्यासाठी कर्मचार्‍यांचे ‘सॉफ्ट स्किल्स’ विकसित करण्याची सतत गरज असल्याने सातत्याने समोर आले आहे.


हेही वाचा : मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यात आणखी 18 वाहनांचा होणार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -