घरमहाराष्ट्र'काँग्रेसच्या पाकिस्तानी वृत्तीचा निषेध'

‘काँग्रेसच्या पाकिस्तानी वृत्तीचा निषेध’

Subscribe

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान व बदनामी करणाऱ्या काँग्रेसच्या पुस्तिकेवर महाराष्ट्रात बंदी घाला, अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे करीत, भाजपा नेते, माजी शिक्षणमंत्री आमदार अँड. आशिष शेलार यांनी काँग्रेसच्या या कृत्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.
काँग्रेसच्या सेवादलाकडून भोपाळमध्ये स्वा. वि.दा. सावरकर यांची बदनामी करणारी पुस्तिका वाटण्यात आली आहे. आज सोशल मिडिया मुळे अशा गोष्टी झपाट्याने पसरतात व ही पुस्तिका महाराष्ट्रात पोहचायला वेळ लागणार नाही. ही बाब सावरकर प्रेमींमध्ये संतापाची लाट पसरवणारी असून भाजपतर्फे आम्ही याचा अत्यंत तीव्र शब्दात निषेध करतो.

महाराष्ट्रात ही पुस्तिका वितरित होऊ नये यासाठी त्यावर तातडीने महाराष्ट्र सरकारने बंदी आणावी. तसा प्रयत्न करणाऱ्यांवर तातडीने कडक कारवाई करावी, अशी मागणी आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे करीत आहोत. आमदार अँड. आशिष शेलार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, अफजल खान जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावर चाल करुन आला होता तेव्हा त्याने हिंदूची प्रतिके असणाऱ्या देवळांवर हल्ले चढविण्यास सुरुवात केली होती. हिंदूस्थानला नष्ट करण्याचा विढा उचलून आलेल्या खाना प्रमाणेच काँग्रेस हा देशातील देशभक्तांच्या प्रतिकांवर हल्ले चढवत तर नाही ना? अशी भिती आता निर्माण होते आहे. आम्ही काँग्रेसच्या या पाकिस्तानी वृत्तीचा निषेध करू व त्याविरोधात कडवा संघर्षही करू असेही आमदार आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

राहुल गांधी यांची ही इटालियन पास्तावाली काँग्रेस वारंवार स्वा. सावरकरांचा अपमान करते आहे. स्वा. सावरकरांबाबत राहुल गांधी यांनी आपले अघात ज्ञान पाजळणे थांबवावे. देशभक्तांच्या सहनशीलतेचा अंत त्यांनी करु नये, असेही आमदार अँड. आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -