घरमनोरंजनधक्कादायक! केरळची महिला म्हणते,अनुराधा पौडवाल माझ्या आई!

धक्कादायक! केरळची महिला म्हणते,अनुराधा पौडवाल माझ्या आई!

Subscribe

केरळच्या एका महिलेने बॉलिवूड गायिका अनुराधा पौडवाल या आपल्या आई असल्याचा दावा केला आहे. ४५ वर्षीय करमाला मॉडेक्स यांनी तिरूअनंतपुरम या कौंटूबीक न्यायालयात ६७ वर्षीय गायिका अनुराधा पौडवाल यांच्या विरोधात केस दाखल केली आहे. त्याचबरोबर ५० कोटी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

करमाला यांनी एका मुलाखतीत सांगितले, करमाला यांच्या म्हणण्यानुसार त्यांचा जन्म १९७४ मध्ये झाला. त्यानंतर केवळ ४ दिवसांच्या असताना अनुराधा यांनी पोंनाचन आणि अगसेन या दाम्पतांकडे बाळाला सोपवले होते. कारण त्या काळात अनुराधा पौडवाल या आपल्या गायिकेची करियरमध्ये व्यस्त होते. माझे वडिल आर्मित होते आणि ते महाराष्ट्रात कार्यरत होते. ते अनुराधा यांचे चांगले मित्र आहेत. कालांतराने त्यांनी बदली केरळमध्ये झाली. अनुराधा या करियरमध्ये बिझी होत्या त्यामुळे त्यांना माझ्याकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता, त्यामुळे त्यांनी मला दुसऱ्याकडे सोपवले. पण आता मला माझी आई परत हवी आहे.

- Advertisement -

वडिलांनी सांगितलेले सत्य ऐकल्यावर करमाला यांना अनुराधा यांना फोनवरून संपर्क करण्याचा अनेकदा प्रयत्न केला. मात्र समोरून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर करमालाचा नंबर ब्लॉक करण्यात आला. आता या प्रकरमावर अनुराधा पौडवाल यांच्याकडून अद्याप काही प्रतिक्रीया आलेली नाहीये. करमाला चे वकील अनिल प्रसाद यांनी सांगितले की, अनुराधा यांनी हा दावा धुडकावला तर डीएनए टेस्टची आम्ही कोर्टात मागणी करणार आहोत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -