घरमहाराष्ट्रनिवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचा 'मराठी भाषा दिन'

निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचा ‘मराठी भाषा दिन’

Subscribe

मराठी भाषा दिनानिमित्ताने लोकांसमोर चमकण्यासाठी विविध पक्षांकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्यावर्षी यापैकी एकही पक्ष कुसुमाग्रजांच्या निवासस्थानी फरकटले नव्हते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांकडून मराठी भाषा दिनानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

निवडणूक जवळ आली की, लोकांसमोर चमकण्यासाठी नेतेमंडळी एक संधीही सोडत नाही. याचे ताजे उदाहरण म्हणजे मराठी भाषा दिना निमित्ताने आयोजित करण्यात येणारे कार्यक्रम. ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीदिनानिमित्ताने मराठी भाषा दिन साजरा केला जातो. दरवर्षी मराठी भाषा दिन विविध साहित्य संघटनांकडून आयोजित करण्यात येतो. परंतु, यावर्षी विविध पक्षांकडून हा दिवस साजरा केला जाणार आहे. गेल्यावर्षी या पक्षांपैकी एकही नेता कुसुमाग्रज यांच्या घराकडे फिरकले नव्हते आणि यावर्षी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दिवस राज्यभरात साजरी केला जाणार आहे. भाजपकडूनदेखील असाचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्याचबरोबर काँग्रेसकडूनही असा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.

‘या’ अभिनेत्रींनी काँग्रेसमध्ये केला प्रवेश

कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीदिनी म्हणजे २७ फेब्रुवारीला मराठा भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांकडून मराठी भाषा दिनाचे निमित्त साधून विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान काँग्रेसकडून आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमामध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्री आसावरी जोशी, ‘भाभीजी घरपे है’ फेम सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री शिल्पा शिंदे आणि सुप्रसिद्ध संगीतकार अमित राज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आसावरी जोशी आणि शिल्पा शिंदे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

- Advertisement -

काँग्रेसकडून ‘कसे गीत झाले’ कार्यक्रम

कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त २७ फेब्रुवारी हा दिवस “जागतिक मराठी भाषा दिन” म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून बुधवार २७ फेब्रुवारी २०१९ रोजी मुंबई काँग्रेसतर्फे गुरुयोग निर्मित “कसे गीत झाले” या संगीतमय मराठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केलेले आहे. या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध अभिनेत्री आसावरी जोशी, भाभीजी घरपे है कार्यक्रमातून घराघरात पोहचलेल्या सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री शिल्पा शिंदे आणि सुप्रसिद्ध संगीतकार अमित राज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम मुंबईतील गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगर नं. ३ मधील आझाद मैदान येथे सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. अनेक सदाबहार मराठी गाण्यांच्या जन्मकथा उलगडणाऱ्या या कार्यक्रमाची निर्मिती जनामनांच्या ओठावर रुळणारी आणि मनात रुंजी घालणारी अगणित लोकप्रिय मराठी गाणी देणारे कवी गुरु ठाकूर यांनी केली आहे. तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने संगीत रसिकांना सुप्रसिद्ध गायिका योगिता चितळे, गायक नचिकेत देसाई आणि स्वतः गुरु ठाकूर यांच्या मधुर स्वरांमध्ये सदाबहार मराठी गाण्यांचा आनंद लुटता येईल. तसेच या कार्यक्रमाचे संगीत संयोजन प्रशांत लळीत करणार आहेत.


हेही वाचा – मराठी भाषा दिनानिमित्त ‘मम… मराठी कक… कमळ’चा कार्यक्रम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -