घरदेश-विदेशराफेलची किती आवश्यकता आहे हे जाणवतंय - माजी हवाई दल प्रमुख

राफेलची किती आवश्यकता आहे हे जाणवतंय – माजी हवाई दल प्रमुख

Subscribe

वायूसेनेने केलेल्या हवाई हल्ल्यावर माजी हवाई दल प्रमूख एअर चीफ मार्शल अनिल टिपणीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'यावेळी आता राफेलची किती आवश्यकता आहे, याची जाणीव होत आहे', असे टिपणीस म्हणाले आहेत.

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे १४ डिसेंबरला मोठी दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात देशाचे ४० पेक्षा जास्त जवान शहीद झाले होते. त्यानंतर संपूर्ण देशातून या हल्ल्याचा बदला घ्या, अशी आरोळी मारली जात होती. भारतीय हवाई दलाने आज पहाटे ३.३० वाजता पाकिस्तानमध्ये घुसून जैश ए मोहम्मदच्या तळांवर हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानात प्रचंड हालचालींना सुरुवात झाली आहे. दरम्यान, भारताचे माजी हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अनिल टिपणीस यांनी यासंदर्भात आपली प्रतिक्रिया दिली आहे. या कारवाईनंतर राफेलची किती आवशकता आहे हे जाणवत आहे, असे टिपणीस म्हणाले आहेत.

नेमकं काय म्हणाले मार्शल टिपणीस?

मार्शल अनिल टिपणीस म्हणाले की, ‘वायुसेना, तुम्ही आपलं ध्येयवाक्य सिद्ध करुन दाखवलं, कारवाईची बातमी समजल्यावर पहिल्यांदा हाच विचार आला. या कारवाईनंतर राफेलची किती आवश्यकता आहे हे जाणवत आहे. राफेल ३६ का आणले १२६ का नाहीत? असे प्रश्न देशाने विचारायला पाहिजेत. मात्र, आपल्याकडे दुसराच वाद सुरु आहे. सोबतच ही कारवाई झाली म्हणजे सगळं झालं असं नाही. चीन, पाकिस्तानच्या हालचाली बघून आपल्याला तयार राहिलं पाहिजे.’ त्याचबरोबर त्यांनी मिराज 2000 या लढाऊ विमानाचं महत्त्व देखील विशद केले आहे. याच लढाऊ विमानांच्या सहाय्याने आज सकाळी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला करण्यात आला आहे. ते म्हणाले की, ‘मिराज 2000 हे मल्टीपर्पज एअरक्राफ्ट आहे. ते त्याचं टारगेट एनवेळी देखील बदलू शकतं. हे स्मार्ट वेपन पैकी एक आहे. तुमचा निशाणा योग्य नसेल तरीसुद्धा तुम्ही टारगेट उडवू शकतात.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -