घरताज्या घडामोडीकॉंग्रेस शिवाजी पार्कात करणार शक्तीप्रदर्शन - एच के पाटील

कॉंग्रेस शिवाजी पार्कात करणार शक्तीप्रदर्शन – एच के पाटील

Subscribe

कॉंग्रेस स्थापना दिनासाठी सोनिया, राहुल गांधींना निमंत्रण

कॉंग्रेस समितीच्या आज शुक्रवारी झालेल्या बैठकीमध्ये कॉंग्रेस स्थापना दिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली. कॉंग्रेस पक्षाच्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने येत्या २८ डिसेंबर रोजी शिवाजी पार्कात शक्ती प्रदर्शन करणार असल्याची माहिती कॉंग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच के पाटील यांनी जाहीर केले. या कार्यक्रमासाठी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी निमंत्रित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाजी पार्क मैदानाला आपला स्वतःचा असा इतिहास आहे. त्यामुळेच या एतिहासिक मैदानावरच सभा आणि रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई प्रदेश कॉंग्रेसकडून शहरात मोठा कार्यक्रम करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. यादिवशी पक्षाच्या आणखी कार्यक्रमाची घोषणाही होईल असेही ते म्हणाले.

आज कॉंग्रेस कमिटीच्या झालेल्या बैठकीत पक्षाच्या जाहीरनाम्यावर चर्चा झाली. त्यासोबतच कॉंग्रेसच्या स्थापना दिनाच्या निमित्तानेही चर्चा झाल्याचे ते म्हणाले. कॉंग्रेस आगामी कालावधीत निवडणुकांसाठी सध्या काय रणनिती असणार यासाठीचा अभ्यास करत आहे. त्यासाठीच अभ्यास आणि विचार मंथनासाठी आम्ही येत्या कालावधीत पुन्हा एकदा भेटत आहोत. राज्यात आगामी निवडणुका पाहता आघाडीबाबत काय रणनिती असेल यससााठी आम्ही पुन्हा भेटणार आहोत असेही ते म्हणाले. आम्हाला निवडणुकांसाठी काय धोरण आखायचे आहे, याचा अभ्यास करायचा आहे, असेही ते म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्ही स्थानिक पातळीवरचे मत विचारात घेणार आहोत असे पाटील म्हणाले. जिल्हा पंचायत निवडणुकांसाठी आम्ही जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे मत विचारात घेऊ. तर मुंबई महापालिका निवडणूकीत मुंबई प्रदेश कॉंग्रेसचे मत विचारात घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आम्ही एकटेच लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

योजनेचे नाव बदलणे दुर्दैवी

राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलणे हे अतिशय दुर्दैवी आहे. भारत सरकारच्या या निर्णयामुळे आम्हाला धक्का बसला आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलणे यामध्ये दुर्दैवी हेतू आहे. हा निर्णय राजकीयदृष्ट्या झाल्याचेही ते म्हणाले. राजीव गांधी यांचे योगदान क्रीडा क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळेच ध्यानचंद यांचे एखाद्या वेगळ्या पुरस्काराला नक्कीच नाव देता आले असते असेही एच के पाटील म्हणाले.

महाराष्ट्राला अधिक मदत गरजेची होती

महाराष्ट्रातील कॉंग्रेसचे मंत्री तसेच स्थानिक पातळीवरील नेत्यांनी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीसाठी मदत केली आहे. अशावेळी महाराष्ट्राला मदत करण्यासाठी केंद्राने घाई करायला हवी होती. पण केंद्राची मदत कुठेय असा सवाल पाटील यांनी केला. एनडीआरएफची जी मदत येणे अपेक्षित होती ती आलेली नाही असेही ते म्हणाले. त्यामुळे महाराष्ट्राला मदत करताना पंतप्रधान, गृहमंत्री, अर्थमंत्री आहेत कुठे असेही ते म्हणाले.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -