घरमहाराष्ट्रनाशिकदीड हजार वर्षांपूर्वीच्या 'या' प्राचीन मंदिरांचे संवर्धन

दीड हजार वर्षांपूर्वीच्या ‘या’ प्राचीन मंदिरांचे संवर्धन

Subscribe

नाशिक । सिन्नर येथील गोंदेश्वर मंदिराच्या संवर्धनास राज्य शासनाने मंजुरी दिली असून, या मंदिराच्या विकासाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. राज्य सरकारने नाशिकमधील गोंदेश्वर मंदिरासह राज्यातील तीन मंदिरांच्या विकासासाठी १०१ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. एमएसआरडीसीने चार सल्लागारांच्या माध्यमातून आराखडा तयार करून त्यास मंजुरी घेतली आहे.

सिन्नरमधील गोंदेश्वर मंदिर १२ व्या शतकात गवळी राजकुमार राजगोविंद याने बांधलेले आहे. गोंदेश्वर मंदिर हे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर या तालुक्याच्या गावी असलेले महादेवाचे मंदिर आहे. मार्च १९०९ साली भारत सरकारने या मंदिराला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले. ‘सेऊना’ म्हणजेच यादव घराण्यातील राजगोविंद हा राजा. ‘सेऊनाचंद्र’ या राजाने वसविलेले ‘सेउनापुरा’ म्हणजेच सिन्नर. खिलजीच्या आक्रमणामुळे या राजवटीची वाताहत झाली. काळ्या बेसाल्टमध्ये बांधलेले हे मंदिर अजूनही सुस्थितीत आहे. मुख्य शिवमंदिर व सभोवती चार उपदिशांना चार मंदिरे असल्याने याला शैवपंचायतन म्हटले जाते. यातील गोंदेश्वराचे मुख्य शिवमंदिर मध्यावर असून सभोवतीची मंदिरे पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू यांची आहेत. गर्भगृहावर बांधलेले, आकाशाकडे झेपावणारे मंदिराचे पटईचे शिखर अतिशय देखणे असून अप्रतिम कोरीवकामाने सजवलेले आहे. गर्भगृहात रेखीव पिंड आहे. सभामंडपातील खांब नक्षीने कोरलेले असून, त्यावर आणि मंदिरांच्या भिंतींवर देव-देवता, गंधर्व-अप्सरा, पौराणिक आणि रामायणातील प्रसंग
कोरलेले आहेत.

- Advertisement -

 

“हे केंद्र संरक्षित ए.एस.आय.चे स्मारक असून, एमएसआरडीसीतर्फे याचा विकास आराखडा आखला जात आहे. त्यात आपल्या पॅनलचा आर्किटेक्ट नेमून भारतीय पुरातत्व खाते आराखडा तयार करतेय. यामुळे मंदिर सौंदर्यात भर पडेल.” – डॉ तेजस गर्गे, संचालक, पुरातत्व विभाग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -