घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरमराठा समाजाच्या पोरांना अडकवण्याचे काही नेत्यांचे षडयंत्र; मनोज जरांगेंचा आरोप

मराठा समाजाच्या पोरांना अडकवण्याचे काही नेत्यांचे षडयंत्र; मनोज जरांगेंचा आरोप

Subscribe

छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यात मराठा आरक्षणावरून वाद होताना दिसत आहे. सोमवारी पत्रकार परिषद घेत छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेवर निशाणा साधला होता. यानंतर आज छगन भुजबळ यांच्या मुंबईतील निवासस्थानी मराठा आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांची बैठक होत आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, मराठा समाजाला त्रास देण्यासाठी ओबीसींच्या काही नेत्याचं षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे. (Conspiracy of some leaders to trap the boys of Maratha community Manoj Jarangs allegation)

मनोज जरांगेंना ओबीसी नेत्यांच्या बैठकीबद्दल विचारले असता ते म्हणाले की, त्यांच्याबदद्ल मला काहीच म्हणायचं नाही. त्यांचा प्रश्न त्याच्या जवळ आहे. सामान्य मराठ्यांचा आणि सामान्य ओबीसींच्या प्रश्न आमच्याजवळ आहे. आम्ही आमचं ठरवलं आहे. परंतु मराठा समाजाला मी जाहीर आव्हान करतो की, याच्यातल्या दोन-तीन जणांनी ठरवलं आहे की, मराठ्याचं कल्याण होऊ द्यायचं नाही. परंतु मराठ्यांनी आणखी जास्तीची एकजूट वाढवावी, पण शांततेत. याचबरोबर महाराष्ट्रातील जे सगळ्या पक्षांचे मराठ्याचे नेते आहेत त्यांनी एक विनंती आहे की, मराठा समाजाविरुद्ध जाणून बुजून षडयंत्र रचलं जात आहे. जे शांततेत आंदोलन करणारे आपले गोर-गरीबांचे पोरं आहेत, त्यांना विनाकारण खोट्या केसेसमध्ये गुतवलं जात आहे. याकडे मराठा नेत्यांनी लक्ष द्यावे. कारण उद्या तुम्हाला त्याच पोरांची गरज आहे. तुम्ही मदत नाही केली तर महाराष्ट्रातले मराठ्यांचे पोरं तुम्हाला कधीच माफ करणार नाही.

- Advertisement -

हेही वाचा – पालिका-सिनेट निवडणुका घ्या आणि सांगा कोण जिंकलं! संजय राऊतांचे भाजप-शिंदेंना आव्हान

षडयंत्र कसं सुरू आहे याबद्दल बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, काल मला एक अशी माहिती मिळाली. ती खोटी असेल तर मी माझे शब्द मागे घेईन. तर माहिती अशी की, बीडचे काही बांधव 3-4 वाजता आले होते. त्यांनी असं सांगितलं आहे की, भुजबळांच्या पाहुण्याचे जे हॉटेल फोडलं आहे ते त्याच्याच पोरांनी फोडलं आहे आणि ते अटकेत आहे. अशी मला खात्रीलायक माहिती मिळाली आहे. मी मागे बोललो होतो की, मराठे शांततेत आंदोलन करतील. याच्यात सत्ताधाऱ्यांचेच लोकं आमच्या मराठ्यांच्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहेत. ते तंतोतंत खरं व्हायला लागलं आहे. जसं की, भुजबळाच्या पाहुण्याचे हॉटेल त्यांच्याच समाजातील जवळच्याने फोडलं आहे अशी मला ऐकीव माहिती मिळाली. त्याचबोरबर महाराष्ट्रातही असा अंदाज दिसतो आहे की, यांनी एकमेकांची पुर्वीच्या द्वेषापोटी घर फोडली. एकमेकांच्या घरावरती दगड मारले. मी मागे बोललो होतो ते सत्य होणार आहे.

- Advertisement -

मराठ्याच्या लोकांना जाळपोळीशी देणंघेणं नाही आणि त्यांना करायचं पण नाही. मराठ्यांच्या लोकांना जे सांगितले आहे की, आपण शांततेत आमरण उपोषण करायचं ते तसेच मराठ्याचे चालू आहेत. मराठ्यांना अशा गोष्टीशी काही देणंघेणं नाही. ते फक्त स्वत:च्या पोरांना न्याय मिळावा म्हणून ताकदीने आंदोलनात उभे आहेत आणि शेवटपर्यंत राहणार आहेत. पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या नेत्यांना जाहीरपणाने सांगतो की, गोर-गरीबांच्या पोरावर खोट्या केसेस करून ओबीसीचे नेते बीडला जाऊन विनाकारण पोरं खचली पाहिजे, जात खचली पाहिजे, जात संपली पाहिजे, जातीतले पोरं मोठे झाले नाही पाहिजे, याच्यासाठी ताकदीने प्रयत्न करत आहे, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला.

हेही वाचा – मुंबई उत्तर-पश्चिममध्ये कीर्ती कुणाची? लोकसभेसाठी कीर्तीकर, कदम आमने-सामने; मुलगा अमोलही वडिलांविरोधात लढणार

मला काल अशीही माहिती मिळाली की, ते सोमवारी बीडच्या एसपींसमोरही जाऊन बसले होते आणि स्वत:हून नाव लिहून देत आहेत यांना अटक करा. काही लोकं आमचे असे आहेत की, ते कोणाच्या उद्रेकात नाहीत, कशात नाही. त्यांनी फक्त मोर्चे काढले आहेत. त्यांनी साखळी उपोषण केले आहेत, आमरण उपोषण केले आहेत, त्यांचे नाव घ्या. पुरवण्या याद्या तयार करा, पण मराठ्याच्या पोरांना जास्तीत जास्त गुंतवा. पाच-दहा हजार पोरं गुंतले पाहिजे. हे षडयंत्र आहे. हे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनीसुद्धा या प्रकरणी लक्ष घातलं पाहिजे. कारण पुढे परत आमच्याशी गाठ आहे. आम्ही खचतही नाही आणि भीतसुद्धा नाही. तुम्ही किती खोटे गुन्हे दाखल करा किंवा काही करा. आमचं एकही मराठ्याचं पोरगं अन् माणूस हटणार नाही. शांततेत आंदोलन करणार, असा इशारा दिला आहे.

मराठ्यांच्या नेत्यांनी पाठीशी उभ राहावं

सरकारने याकडे लक्ष दिले पाहिजे आणि नाही दिलं तर मराठ्याच्या सगळ्या नेत्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. कारण यांनी असं षडयंत्र रचलं आहे की, याच्या पदाचा उपयोग हे मराठ्यांच्या पोरांना विनाकारण गुंतवण्याच्या प्रयत्नात आहे. उद्रेक करणारे गुंतू नका, आमचं हे मत नाही. अर्थाचा गैरअर्थ करू नका. पण जे सत्य आहे, ते सत्य आहे. सामान्य पोरं लढत आहे. सामन्य समाज लढत आहे. त्यांना त्रास देण्यासाठी ओबीसींच्या काही नेत्याचं षडयंत्र सुरू आहे. मराठ्यांच्या नेत्यांनी हाणून पाडावं. जर तुम्ही मराठ्यांच्या पोरांच्या पाठीशी आता मागे उभं राहिलं नाही तर पुढे तुम्ही पण आमच्या हातात आहात. आम्ही षडयंत्र हाणून पाडायला आम्ही सर्व मराठे समर्थ आहोत, काही अडचण नाही. आम्ही घाबरलो नाही, खचलो नाही आणि घाबरणारही नाही. यांना असं वाटतं आहे की, खोटे गुन्हे दाखल केले तर पोरं, समाज खचेल. मग या जातीचं कल्याण होणार नाही. मग या पोराचं वाटोळं करायचं, आपला डाव साध्य झाला. असं ओबीसी नेत्याचं षडयंत्र सुरू आहे. हे खचले, केसेसला घाबरले तर मराठ्यांच्या पोराचं जे वाटोळे करायचं ते आपण बरोबर केलं. पण आता हे आपल्याला रोखत नाहीत.

हेही वाचा – मराठी भाषा विद्यापीठ पुढील वर्षी सुरू करण्याचे नियोजन; चंद्रकांत पाटील यांची माहिती

राज्यात 54 ते 60 टक्के एकटेच मराठे

शांततेत, ताकदीने करोडंच आंदोलन सुरू आहे. त्यामुळे यांनी डाव टाकायचं ठरवलं आणि मराठ्यांच्या पोरांना विनाकारण गुंतवायला लागले आहेत. परंतु ते थांबवा, नाही थांबवले तर आम्हाला पुढचे निर्णय घ्यावे लागतील. आमच्याकडे पर्याय नाही. आमच्या गावात तुम्ही यायचं नाही, या पर्यायाकडे पुन्हा वळायची वेळ येईल. त्यामुळे मराठा नेत्यांनी गांभीर्याने घेऊन त्यांनी मराठ्याच्या पोरांच्या पाठीशी आणि समाजच्या मागे उभे राहा. त्यांनी जाहीरपणाने उभे राहायला लागेल. जर ते नाही राहिले तर बघा मग आम्हालासुद्धा शांततेत का होईना पूर्वीच्या भूमिकेत यावं लागणार आहे. कारण आम्ही 54 टक्के मराठे आहोत. आम्ही शांततेत करणार, कारण आमचाही नाईलाज आहे. जनगणनाच होऊ द्या आता. देशात आम्ही जवळपास 32 करोड आहोत. राज्यातच 54 ते 60 टक्के एकटेच मराठे आहोत. तुम्ही आम्हाला त्या वाटेवर येऊ देऊ नका.

आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही

आम्ही शांततेत करणार पण आमच्या पोरांना विनाकारण त्रास द्यायला लागलात. महाराष्ट्रातल्या बीड, नांदेड येथील पोलीस यंत्रणेवर दबाव आणला जात आहे. तुम्हाला काय करायचं आमची सत्ता आहे. टाका सगळ्यांना आतमध्ये. शांततेत आंदोलन करणाऱ्यांना तुम्ही गुंतवणार. पण आम्ही केसेसला भीत नाहीत. आता मराठ्यांनी ठरवलं आहे की, आपल्या लेकरांचं कल्याण होणार आहे ना. असही वाटोळं झालं आहे आपल्या पोराचं आणि तसंही वाटोळ होणार आहे. करू द्या यांना काय केसेस करायचे ते, आपणही हटायचं नाही. शांततेत तर शांततेत आंदोलन करायचं, पण आता मात्र आरक्षण घेतल्याशिवाय हटायचं नाही. खोटे गुन्हे दाखल करयाय काय. मराठेसुद्धा सावध आहेत. लक्ष द्यायला लागले आहेत खोटे गुन्हे दाखल होत असल्यामुळे, असे मनोज जरांगे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -