घरताज्या घडामोडीबाळूमामांच्या वारसावरुन नवा वाद, मनोहर मामांनी दिले स्पष्टीकरण

बाळूमामांच्या वारसावरुन नवा वाद, मनोहर मामांनी दिले स्पष्टीकरण

Subscribe

आपण बाळूमामाचे भक्त आहोत. बाळूमामाची उपासना करतो. परंतु आजपर्यंत कधीही बाळूमामाचे वशंज किंवा त्यांचे आवतार असल्याचे वक्तव्य केलेले नाही.

अनेक वर्षांपासून बाळूमामांचे (Balu Mama) कोल्हापूरातील (Kolhapur) आदमापूर (Admapur) गावात मोठे प्रस्थ आहे. मात्र आता पुन्हा एकदा बाळूमामांच्या वारसाचा वाद समोर आला आहेच. बाळूमामांचे मूळ स्थान असलेल्या आदमपूर गावातीला ग्रामपंचायतीने करमाळ्यातील बाळू मामांचे भक्त समजल्या जाणाऱ्या मनोहर मामा (Manohan mama) यांच्यावर पत्राद्वारे आरोप केले आहेत. बाळुमामांचे भक्त मनोहर मामा हे संत बाळूमामांच्या नावाचा वापर करुन भक्तांकडून आर्थिक देणगी घेत असल्याचा आरोप आदमपूर ग्रामपंचायतीचे सरपंच विजय गुरव यांनी केला. त्यामुळे बाळूमामांचे भक्त आणि मनोहर मामा यांच्या वादाला सुरुवात झाली आहे.

ग्रामपंचायतीने केलेल्या आरोपांवर मनोहर मामा यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, आपण बाळूमामाचे भक्त आहोत. बाळूमामाची उपासना करतो. परंतु आजपर्यंत कधीही बाळूमामाचे वशंज किंवा त्यांचे आवतार असल्याचे वक्तव्य केलेले नाही. त्याचप्रमाणे श्रीक्षेत्र उंदरगाव येथील मठातून भक्तांची कोणतीही आर्थिक लूट केलेली नाही,असे मनोहर मामा यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

त्याचप्रमाणे पुढे मनोहर मामांनी म्हटले आहे की, आपण बाळूमामाचे वारसदार किंवा शिष्य नाहीत आपण त्यांची केवळ भक्त म्हणून सेवा करतो. उंदरगाव येथे माझ्या स्वत:च्या शेतात बाळूमामाचे मंदिर बांधले आहे. माझा आणि आदमपूर येथील बाळूमामा संस्थेचा किंवा मंदिराशी कोणताही संबंध नसल्याचे मनोहर मामा यांनी सांगितले.


हेही वाचा – अंधश्रद्धेचा उलट्या पावलांचा प्रवास थांबवायला हवा…

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -