घरट्रेंडिंगकरोना व्हायरसची लागण सोन्यालाही, झपाट्याने सोन्याचे दर घसरले, चांदी महाग

करोना व्हायरसची लागण सोन्यालाही, झपाट्याने सोन्याचे दर घसरले, चांदी महाग

Subscribe

करोनाच्या संकटात गुंतवणुकदारांना दिलासा देणारा निर्णय अमेरिकन फेडरल रिझर्वमार्फत घेण्यात आला आहे.

सोन्याच्या दरामध्ये आज ११५५ रूपयांची घसरण होऊन सोने ४४ हजार ३८३ रूपयांपर्यंत प्रति तोळे (१० ग्रॅम) असे खाली घसरले. सातत्याने रूपयांचे होणारे अवमूल्यनच यासाठी कारणीभूत ठरले आहे. सोन्याच्या दरात घसरण झालेली असली तरीही चांदीच्या दरात मात्र ११९८ रूपयांची वाढ झाली. एकाच दिवसात सोन्याच्या किमतीत ही घसरण पहायला मिळाली आहे. याआधी सोन्याची किंमत तोळ्यामागे १५०० रूपयांनी एकाच दिवसात वाढली होती. अमेरिकन फेडरल रिझर्वमार्फत रेट कटने व्याज दरात कपात केल्याची घोषणा केल्यानंतर सोन्याच्या किंमतीवर हा परिणाम पहायला मिळाला आहे. करोना व्हायरससाठी अनेक देशांमध्ये आर्थिक स्थितीला मदत करण्यासाठी ही रेट कटची घोषणा करण्यात आली आहे.

चांदीच्या किंमतीतही ११९८ रूपयांची वाढ होत चांदीचा प्रति किलो दर ४७ हजार ७२९ रूपये इतका झाला. भारतीय रूपयामध्ये या सर्व बदलानंतरही सातत्याने घसरण पहायला मिळत आहे. व्याजदरातील कपातीचा परिणाम हा सोन्याच्या खरेदीवर आणि सोन्याच्या दरात कपात होण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे. पण चीन आणि अमेरिकेबाहेर सोन्याच्या खरेदीवर ग्राहकांचा भर राहणार असल्याचे तज्ञांचे मत आहे. ऑन स्पॉट खरेदीमध्ये दिल्लीत सोन्याच्या किंमतीत ११५५ रूपये इतकी वाढ पहायला मिळाली आहे.

- Advertisement -

करोना व्हायरसच्या प्रकोपामुळे जगभरात शेअर बाजारात मोठा चढउतार पहायला मिळाला आहे. अमेरिकन यूएस फेडरल रिजर्व संस्थेने गुंतवणुकदारांची चिंता कमी करत व्याजदरात रेट कट कमी करण्याचा पर्याय सूचवला होता. त्यानुसार आता व्याजदरात कपात करण्यात आली आहे. जगभरात करोना व्हायरसमुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम पहायला मिळाला आहे. भारतीय बाजारपेठेलाही या करोन वायरसचा फटका बसला आहे. भारतात अजुनही करोना वायरसचा मोठा फटका बसलेला नाही, तरीही भारतीय अर्थव्यवस्थेवर मात्र हा परिणाम दिसायला सुरूवात झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -