घरमहाराष्ट्रकरोना व्हायरस- मुंबईत तीन जण करोना निरीक्षणाखाली; ८० नमुने निगेटिव्ह  

करोना व्हायरस- मुंबईत तीन जण करोना निरीक्षणाखाली; ८० नमुने निगेटिव्ह  

Subscribe

आतापर्यंत निरीक्षणाखाली ठेवण्यात आलेल्या ७९ जणांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या मुंबई आणि पुणे येथे प्रत्येकी तीन जण निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात परतणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जात आहे. मुंबईत आता तीन जण करोना निरीक्षणाखाली असून आतापर्यंत ७९ जणांना हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले आहे.

निरीक्षणाखाली ठेवलेल्या ८२ पैकी ८० जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना निगेटिव्ह आले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आतापर्यंत राज्यात बाधित भागातून २८८ प्रवासी आले असून ताप, सर्दी, खोकला या लक्षणांमुळे विलगीकरण कक्षात ८२ जणांना भरती करण्यात आले होते.
त्यापैकी ८० जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा एन.आय.व्ही पुणे यांनी दिला आहे. दाखल झालेल्या ८२ प्रवाशांपैकी ७९ जणांना हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले आहे. सध्या ३ जण मुंबई येथे दाखल आहेत. तर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ४६ हजार २१८ प्रवासी तपासण्यात आले आहेत.
राज्यात सर्व जिल्हा हॉस्पिटल तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले असून राज्यात सध्या ३९ विलगीकरण कक्षांमध्ये ३६१ बेडस उपलब्ध आहेत. शिवाय, मुंबईच्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये करोनासाठी स्वतंत्र कक्ष देण्यात आला आहे. जिथे चीनहून परतणाऱ्या रुग्णांची तपासणी आणि त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. मुंबईत आता तीन संशयित प्रवाशांवर उपचार केले जात आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -