घरमहाराष्ट्रराज्यात मातामृत्यू दर कमी करणं गरजेचं - आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन

राज्यात मातामृत्यू दर कमी करणं गरजेचं – आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन

Subscribe

भारतात आजही मातामृत्यू दर कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न आणि उपाययोजना राबवणं गरजेचं असल्याचं मत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केलं आहे. तसंच, राष्ट्रीय प्रजनन आरोग्य संशोधन संस्थेने मातामृत्यू दर कमी करण्यास मदत करणं आवश्यक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

भारतात आजही मातामृत्यू दर कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न आणि उपाययोजना राबवणं गरजेचं असल्याचं मत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केलं आहे. तसंच, राष्ट्रीय प्रजनन आरोग्य संशोधन संस्थेने मातामृत्यू दर कमी करण्यास मदत करणं आवश्यक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. मोदी सरकारने २०२५ पर्यंत क्षयरोगाच्या समूळ उच्चाटनाचा विडा उचलला आहे. तर, २०२२ पर्यंत ‘शून्य अतिसार रुग्ण’ असेही ध्येय असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी स्पष्ट केलं आहे.

यावेळी डॉ. हर्षवर्धन यांनी राष्ट्रीय प्रजनन आरोग्य संशोधन संस्थेचे कौतुकही केले. पण, प्रसुती होताना नवमातांचा होणाऱ्या मृत्यूवर लक्ष देण्याची गरज असल्याचंही तीव्रतेने सांगितलं. नवमातांचा मृत्यूदर जीव हेलावून टाकणारा आहे. हा दर कमी करण्याची जबाबदारी घेणे‌ आवश्यक असल्याचे‌ आवाहन केंद्रीय आरोग्य‌मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केले. गेल्या दोन दिवसांपासून केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन मुंबई दौऱ्यावर आहेत. यानिमित्ताने मुंबईतील अनेक प्रकल्पांचं उद्गाटन केलं.  भारतीय वैद्यकीय क्षेत्रात पहिल्या टेस्टट्युब प्रयोगात राष्ट्रीय प्रजनन‌ आरोग्य संशोधन संस्थेचे‌ महत्वाची भूमिका आहे. १९८६ या वर्षात पालिकेच्या केईएम हॉस्पिटलमध्ये टेस्टट्यूब प्रयोग झाला. तो प्रयोग देखील यशस्वी झाला.

डॉ. हर्षवर्धन यांनी प्रसूती काळात होणाऱ्या स्त्रियांच्या मृत्यूबाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, ‘ माता मृत्यू दराचे प्रमाण कमी करण्यास भारताला यश मिळाले आहे. पण, एकाही मातेचा मृत्यू होऊ नये किंवा तिचा जीव धोक्यात येऊ नये हे बघणे ही आपली जबाबदारी आहे. तसेच संसदेच्या पुढील अधिवेशनात एमटीपी, गर्भपात आणि सरोगसी याबाबत तीन विधेयकं मांडण्यात येणार आहे.

२०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त भारत – 

येत्या २०२५ पर्यंत क्षयरोग निर्मूलनासाठी संस्थानी मदत करावी. क्षयरोगाच्या समूळ उच्चाटनासाठी सरकार कटिबद्ध असून २०२२ पर्यंत ‘शून्य अतिसार रुग्ण’ ध्येय गाठण्याचे ठरवले असल्याचे डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितले.

नवीन संस्थात्मक संकुलाचे उद्घाटन – 

पनवेल येथील राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेच्या नवीन संस्थात्मक संकुलाचे उद्घाटन शनिवारी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते करण्यात आले.

आयुषमान भारत योजनेअंतर्गत ८६ लाख रुग्णांना लाभ – 

आयुषमान भारत योजना आम्ही चांगल्याप्रकारे राबवत आहोत. या योजने अंतर्गत आत्ता पर्यंत तब्बल ८६ लाख जणांनी या योजनेत सहभाग नोंदवला आहे, असंही केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -