घरCORONA UPDATEउद्धवा....तू लढत रहा वाघा.. आमचा तुझ्यावर विश्वास आहे!

उद्धवा….तू लढत रहा वाघा.. आमचा तुझ्यावर विश्वास आहे!

Subscribe

अभिनेते किरण माने यांनी फेसबुक पोस्ट करून मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठिंबा दर्शवला आहे.

सध्या महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा फैलाव वेगाने होत आहे. कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी राज्य सरकार कसोशीने प्रयत्न करत आहे. नागरिकांपर्यंत कोरोनाचा प्रार्दुभाव पोहचू नये यासाठी सरकार सदैव प्रयत्नशील आहे. सध्या महाराष्ट्रात लॉकडाऊन आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद आहे. सरकार सातत्याने कोरोनाकाळात राजकारण करू नका असे सांगत आहे.

तरीसुध्दा काल जी घटना वांद्यात घडली या घटनेमुळे कुठेतरी पुन्हा एकदा राजकारणाला सुरूवात झाली आहे. या घटनेनंतर आरोपप्रत्यारोपांना सुरूवात झाली. काही राजकिय नेत्यांची ट्वीटरव टीव टीव करून झाली. यात कोणी सरकारच्या बाजूने होतं तर कोणी विरोधात. प्रत्येकजण सोशल मीडियावर व्यक्त होतं होतं. पण यावेळी एका अभिनेत्यांने केलेली पोस्टने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले.

- Advertisement -

अभिनेते किरण माने यांनी फेसबुक पोस्ट करून मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठिंबा दर्शवला आहे. सतत सांगतोस,…’मला या संकटप्रसंगी राजकारण नकोय तरीही ‘उद्धवा… काही नतद्रष्टांनी,तुझ्याविरोधात छुपी मोहीम सुरू केलीय,खरंतर तू म्हणालास तसं, ‘राजकारण खेळायला आयुष्य पडलंय’पण मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणारी जमातहे ऐकणार नाही ! तू लढत रहा वाघा.. आमचा तुझ्यावर विश्वास आहे असे या आपल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे.  किरणे माने यांनी आपलं म्हणणं एका छानश्या गद्य कवितेत गुंफलं आहे. तर या कवितेच्या शेवट्या तू बाळासाहेबांचा मुलगा आहेस त्यामुळे तू लढत रहा, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत असे म्हटले आहे. उद्धवा… माझ्या राजा… बाळासाहेबांच्या बछड्या.. तू लढ…आम्ही तुझ्या पाठीशी आहोत !!!

- Advertisement -

हे ही वाचा – #UddhavResign ट्रेंड ट्विटरवर ट्रेंडिंगमध्ये!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -