घरट्रेंडिंगLockDown: 'अशी तयार करा, घरच्या घरी दारू', गुगलवर होतंय सर्वाधिक सर्च!

LockDown: ‘अशी तयार करा, घरच्या घरी दारू’, गुगलवर होतंय सर्वाधिक सर्च!

Subscribe

गुगलच्या ट्रेंडनुसार, भारतात २२ ते २८ मार्च दरम्यान सर्वात जास्त 'घरच्या घरी दारू कशी बनवावी' याचा शोध घेतला गेला आहे.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या लॉकडाऊन दरम्यान सर्व दारूची दुकानं बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र यामुळे ज्यांना दारू पिण्याचे व्यसन आहे त्यांची चांगलीच गैरसोय झाली आहे. फक्त मद्यपींनाच नाही तर जे लोक सिगरेट, बिडी, पान, गुटखा खातात त्यांना देखील या समस्येला सामोरे जावे लागत आहे.

देशातील बर्‍याच भागांमध्ये दारूची दुकानं बंद असल्याने गैर मार्गाने दारूची विक्री तिप्पट पैसे घेऊन केली जात आहे. वाढीव किंमतींसह अनेक ठिकाणी दारू छुप्या पद्धतीने विक्री होत असल्याचे काही प्रकार समोर आले आहेत. अशा परिस्थितीत बर्‍याच लोकांनी दारूचे व्यसन सोडण्याचा निर्णय घेतला तर काही लोक दारूच्या व्यसनापासून लांब राहू शकत नाही त्या लोकांनी दारू कशी मिळवता येईल, या पर्यांयाचा शोध सुरू केला आहे. त्यापैकी एक म्हणजे ‘घरच्या घरी कशी दारू बनवता येईल’.

- Advertisement -

‘होम मेड अल्कोहोल मेकिंग’ सर्वाधिक सर्च

दारूच्या व्यसनाधीन गेलेले काही लोक सध्या घरच्या घरी दारू तयार करण्याचे ऑनलाईन मार्ग शोधत आहेत. हे जाणून घेताना तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. कारण लॉकडाऊन दरम्यान ‘होम मेड अल्कोहोल मेकिंग’ असे सर्वाधिक ऑनलाईन सर्च करण्यात आले आहे. गुगलच्या ट्रेंडनुसार, भारतात २२ ते २८ मार्च दरम्यान सर्वात जास्त ‘घरच्या घरी दारू कशी बनवावी’ याचा शोध घेतला गेला आहे. या काळातच मोदींनी लॉकडाऊनची घोषणा केली होती.


LockDown: इंस्टाग्रामवर पठ्ठ्यानं शोधले ग्राहक; तिप्पट किंमत घेत विकली दारू

मार्चअखेर गैर मार्गाने दारूची विक्री करून दुप्पट किंमतीत दारू विक्री करण्यात आली होती. त्यामुळे अवैध विक्री रोखण्यासाठी काही दुकानांना सील करण्याचा निर्णय घेतल्याचे उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. दुसरीकडे, दारूचे व्यसन असणाऱ्या लोकांनी बाजारात दारूच्या किंमती वाढल्यामुळे १५० रुपयांची व्हिस्की ७०० रुपयांनी खरेदी केली, तर बऱ्याच लोकांनी दारूची जास्त किंमत देऊनही त्यांना दारू उपलब्ध होत नाही असे सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -