घरमहाराष्ट्रHinganghat Burning Case : हिंगणघाट जळीतकांड प्रकरणात आरोपी विकेश नगराळे दोषी, उद्या...

Hinganghat Burning Case : हिंगणघाट जळीतकांड प्रकरणात आरोपी विकेश नगराळे दोषी, उद्या निकाल होणार जाहीर

Subscribe

या प्रकरणाचा निकाल तात्काळ लागावा यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार सरकारने फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण चालवण्यासाठी परवानगी दिली. तसेच अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली होती.

महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या वर्ध्यातील हिंगणघाट जळीतकांड प्रकरणाचा आज निकाल जाहीर झाला आहे. दोन वर्षांपूर्वी आरोपी विकेश नगराळे याने भरचौकात प्राध्यापिका असलेल्या तरुणीला जाळले होते. यानंतर तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी आज हिंगणघाट सत्र न्यायालयाने आरोपी विकेश नगराळेला दोषी ठरवले आहे. याप्रकरणाचा निकाल मात्र उद्या (10 फेब्रुवारी) जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिली आहे. (Hinganghat Session Court) उद्या दोन्ही पक्षांच्या युक्तीवादानंतर न्यायालय दोषीच्या शिक्षेवर निर्णय देणार असल्याची वकील उज्वल निकम म्हणाले आहेत.

आरोपी विकेश नगराळे खुनी घोषित- उज्वल निकम

या प्रकरणात सरकारी ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांनी सांगितले की, न्यायालयाने आरोपी विकेश नगराळेला खुनी घोषित केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे जेव्हा आरोपीला दोषी ठरवले जाते तेव्हा त्याला कुठली शिक्षा द्यावी यासाठी एक दिवसाची मुदत दिली जाते. आरोपीला शिक्षा कोणती हवी आणि सरकारी पक्षाला कोणती शिक्षा हवी, याबाबत उद्या तक्त दाखल करू. त्यानंतर न्यायालय निकाल घोषित करणार आहे, असं उज्वल निकम म्हणाले आहेत.

- Advertisement -

दोन वर्षांपूर्वी वर्ध्यातील हिंगणघाट येथे झालेल्या घटनेची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत कार्यालयीन कामकाजाच्या केवळ 19 दिवसांतच 426 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणी न्यायालयात 64 सुनावण्या झाल्या असून आत्तापर्यंत 29 साक्षीदारांचे प्रत्यक्ष जबाब नोंदवण्यात आले आहेत. 3 फेब्रुवारी 2020 रोजी पीडित प्राध्यापिका महाविद्यालयात जात असताना त्यांना आरोपी विक्की ऊर्फ विकेश नगराळे याने एकतर्फी प्रेमातून पेटवले होते. या घटनेला दोन वर्षे झाली. मात्र यात पीडित प्राध्यापिकेचा मृत्यू झाला. या प्रकरणी आज सुनावणी पार पाडली. या सुनावणीदरम्यान आरोपी विकेश नगराळे याला दोषी घोषित करण्यात आले. मात्र त्याला न्यायालय काय शिक्षा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या प्रकरणाचा निकाल तात्काळ लागावा यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार सरकारने फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण चालवण्यासाठी परवानगी दिली. तसेच अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली होती.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -