घरमहाराष्ट्रपुणेCovid-19 Cases: सावधान 'तो' पुन्हा येतोय...राज्यात कोरोना रुग्णसंख्येत होतेय वाढ

Covid-19 Cases: सावधान ‘तो’ पुन्हा येतोय…राज्यात कोरोना रुग्णसंख्येत होतेय वाढ

Subscribe

मागील काही महिन्यांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली होती. मात्र, आता पावसाने उघडीप दिल्यानंतर पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत किंचित वाढ झाली आहे.

मुंबई : जगभरात कहर घातलेला कोरोना (Covid-19) पुन्हा एकदा परत फिरला आहे. सध्या राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत सून, सध्यस्थितीत राज्यात 109 कोरोनाचे सक्रीय रुग्ण (active patient) असून, यामध्ये सर्वाधिक मुंबईमध्ये (Mumbai) 43 रुग्ण असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

मागील काही महिन्यांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली होती. मात्र, आता पावसाने उघडीप दिल्यानंतर पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत किंचित वाढ झाली आहे. सोबतच कोरोनाचा ओमायक्रॉन EG.5.1 हा नवा व्हेरिएंटही आढळून आला आहे. देशात पहिल्यांदाच या व्हेरिएंटचा रुग्ण सापडला आहे.

- Advertisement -

एक्सबीबी (XBB) चे सापडले रुग्ण

मे महिन्यात ओमायक्रॉन EG.5.1 व्हेरिएंट सापडला होता. मात्र, त्यानंतर जून आणि जुलैमध्ये या व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या की होती. गेल्या दोन महिन्यात राज्यात एक्सबीबी (XBB.1.16 आणि XBB.2.3)व्हेरिएंटचे रुग्ण सापडले आहेत.अशी माहिती बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयातील वरिष्ठ संशोधकांनी दिली.

हेही वाचा : Karnatak Hc : पतीच्या काळ्या रंगाला हिणवणेही ठरू शकते घटस्फोटाचे कारण; कर्नाटक उच्च न्यायालयाने नोंदविले निरीक्षण

- Advertisement -

109 सक्रीय रुग्ण

जुन आणि जुलैनंतर आता ऑगस्टमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. जुलैमध्ये 70 रुग्ण सक्रीय होते ते आता 109 एवढे झाले आहेत. यामध्ये मुंबईत करोनाचे सर्वाधिक 43 सक्रिय रुग्ण आहेत. त्यापाठोपाठ पुण्यात 34 आणि ठाण्यात करोनाचे 25 सक्रिय रुग्ण आहेत. तर रायगड, सांगली, सोलापूर, सातारा आणि पालघरमध्ये करोनाचा प्रत्येकी एक सक्रिय रुग्ण आहे.

हेही वाचा : भाजपा कार्यकर्त्या सना खान 1 ऑगस्टपासून बेपत्ता; घातपाताचा संशय

हा व्हेरीएंट ठरतोय रुग्णवाढीसाठी कारणीभूत

रुग्णांची संख्या वाढण्यासाठी ओमायक्रॉन EG.5.1 व्हेरिएंट कारणीभूत ठरत असल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी EG.5.1 व्हेरिएंटमुळे इंग्लंडमध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. या व्हेरिएंटमुळे इंग्लंडमधील करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -