घरमहाराष्ट्रगाईच्या शेणाचा बाजार तेजीत, ऑनलाईन विक्री !

गाईच्या शेणाचा बाजार तेजीत, ऑनलाईन विक्री !

Subscribe

गोवर्‍या, शेणी, शेणकूट, डंग-केक घरपोच

गोवंश हत्याबंदी कायदा अंमलात आल्यामुळे गोमांस विक्रीच्या अर्थकारणावर काय परिणाम होणार, याची चर्चा थंडावली असली तरी गेल्या काही दिवसांत गायीच्या शेणाचा बाजार मात्र तेजीत आला आहे. ‘गोमया’चे महत्त्व आता ऑनलाईन मार्केटलादेखील पटल्याने गायीच्या शेणाची ऑनलाईन विक्री जोरात आहे.

घरातील धार्मिक विधींसाठी, परसबागेतील शेतीसाठी, डास पळवून लावण्यासाठी गायीच्या शेणापासून बनविलेल्या गोवर्‍या हे रामबाण साधन असल्याची जाहिरातबाजी सुरू झाली आहे. ऑनलाईन विक्री होणार्‍या उत्पादनाच्या यादीत गायीच्या शेणाच्या गोवर्‍यांनी स्थान पटकाविल्याने शेणाच्या महतीची ऑनलाईन चर्चा आणि शंकानिरसनाचे एक ऑनलाईन व्यासपीठ खुले झाले आहे. देशी गायीच्या शेणाच्या ‘गोवर्‍या’, ‘शेणी’, ‘शेणकूट’, ‘डंग-केक’ अशा वेगवेगळ्या नावांनी ‘ब्रँडिंग’ करण्यात आलेले गायीचे शेण आकर्षक वेष्टनातून घरपोच मिळण्याची व्यवस्था ‘ई-मार्केटिंग’मधील काही नामांकित संस्थांनी सुरू केली आहे.

- Advertisement -

२०० ग्रॅम वजनाच्या 8 ते ११ गोवर्‍यांचे पाकीट ४९ ते ९९ रुपयांत उपलब्ध आहे. ‘उघड्या हातांनी थापून नैसर्गिकरीत्या वाळविलेल्या शेणाच्या थापट्या’, ‘घरगुती स्वयंपाकाचे परंपरागत इंधन’ अशी या उत्पादनाची वैशिष्ट्ये नमूद करण्यात आली आहेत. आकर्षक वेष्टनातून ते घरपोच दिले जाते. धार्मिक विधी, यज्ञ, पूजासमयी गायीच्या तुपाची आहुती देऊन हे शेण जाळले असता हवा शुद्ध होऊन प्राणवायूचे हवेतील प्रमाण वाढते, असेही या उत्पादनाच्या वैशिष्ट्यात नमूद करण्यात आले आहे. ‘हवनडंग काऊ केक’, ‘कोकोगार्डन नॅचरल मॅन्युअर’, ‘गौतीर्थ अर्क’, आदी नावानेही शेणाची उत्पादने आता ऑनलाईन मार्केटमध्ये जोरात मुसंडी मारत आहेत. ग्राहकांमध्येही या उत्पादनांविषयी खूप उत्सुकता दिसत आहे.

‘गोवरी’ म्हणजे गाय, बैल, म्हैस या पाळीव जनावरांच्या शेणाचा सुकवलेला भाग असतो. त्याचा इंधन म्हणून वापर केला जातो. शेण थापून आणि वाळवून ’गोवरी’ करून चुलीत इंधन म्हणून जाळली जाते. ग्रामीण भाषेत यांना ‘शेण्या’ असेही म्हणतात. ग्रामीण भागात जळणासाठी गाई-म्हशींच्या शेणापासून गोवर्‍या तयार करतात. या गोवर्‍या साधारणतः उन्हाळ्यात तयार केल्या जातात. शेण एकत्र करून घट्ट असेल तर त्यात पाणी टाकून ते मळतात आणि नंतर एका ठिकाणी वर्तुळाकार तबकडीच्या आकारात थापतात.

- Advertisement -

त्या काही दिवसातच वाळतात आणि घट्ट होतात, वाळलेल्या गोवर्‍या विशिष्ट पद्धतीने थरावर थर रचून वर्षभर जळणासाठी उपयोगी पडाव्या या उद्देशाने साठवतात. चूल, पाण्याचा बंब किंवा होळी पेटविण्यासाठी गोवर्‍यांचा उपयोग होतो. हिंदू धर्मानुसार मृत शरीराचे अंत्यसंस्कार करण्यासाठी शेणाच्या गोवर्‍यांचा वापर केला जातो. एरव्ही दुर्लक्षित असणारे शेण ऑनलाईन मिळू लागल्याने या शेणाला भविष्यात ‘अच्छे दिन’ येणार, हे मात्र नक्की!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -