घरठाणेकल्याणमध्ये रेल्वे रुळाला तडा, पुणे-नाशिककडे जाणाऱ्या गाड्यांना विलंब; लोकलसेवाही विस्कळीत

कल्याणमध्ये रेल्वे रुळाला तडा, पुणे-नाशिककडे जाणाऱ्या गाड्यांना विलंब; लोकलसेवाही विस्कळीत

Subscribe

कल्याण – कल्याण स्थानकावरील रुळाला तडा गेल्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या विलंबाने धावत आहेत. लाईनमनच्या सतर्कतेमुळे रुळाला गेलेले तडे निदर्शनास आले. अन्यता मोठा अनर्थ घडला असता. ६ वाजून ३५ मिनिटांच्या सुमारास तडे गेल्याने इंद्रायण एक्स्प्रेससह पुणे, नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्या आणि लोकलचा खोळंबा झाला होता. सव्वासातच्या सुमारास ही तांत्रिक अडचण दूर करण्यात आली.

कल्याण पत्रीपुलाजवळील रुळाला तडा गेल्याने मंगळवारी सकाळीच प्रवाशांचा खोळंबा झाला. रुळाला गेलेला तडा एका लाईनमनच्या दृष्टीस पडल्याने त्याने तत्काळ वरिष्ठ पातळीवर याच्या सूचना दिल्या. त्यामुळे तत्काळ यावर उपाययजोना करण्यात आली. दुरुस्ती सुरू असताना लांब पल्ल्याच्या गाड्या आणि लोकल काही काळ थांबवण्यात आली होती. त्यामुळे सव्वासातच्या सुमारास वाहतूक हळूहळू पूर्वपदावर करण्यात आली. सकाळ-सकाळीच हा प्रकार घडल्याने कामाला जाण्यासाठी निघालेल्या नोकरदार वर्गाचा खोळंबा झाला. दरम्यान, लांब पल्ल्याच्या गाड्याही ताटकळल्याने कल्याण स्थानकावर प्रवाशांची गर्दी झाली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -